♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मराठा विद्यार्थी, उद्योजक व व्यावसायिकांसाठी खुशखबर… अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना सीएससी केंद्रातून मिळणार माफक दरात सेवा

MH 28 News Live / बुलढाणा : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना आता सीएससी(कॉमन सर्विस सेंटर) केंद्रामधून महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात घेता येणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे लाभार्थी आता त्यांच्या जवळच्या कोणत्याही सीएससी केंद्रावर जावून महामंडळाच्या योजनांचा लाभ कमी दरात घेऊ शकतील. यामध्ये महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, योजनांची सद्यस्थिची तपासणे आणि आवश्यक मार्गदशन मिळविणे यासारख्या सुविधांचा समावेश आहे.

सीएससी केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध सरकारी आणि खाजगी सेवा पुरविण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. महामंडळाने सीएससी केंद्रासमवेत केलेल्या करारामुळे महामंडळाच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल. या करारामुळे उद्दिष्टे अधिक प्रभावीपणे पूर्ण होतील. राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गरजू आणि पात्र तरुणांपर्यंत महामंडळाच्या योजना पोहचणार आहेत. कमी खर्चात आणि त्यांच्या घराजवळच त्यांना आवश्यक सेवा मिळाल्यामुळे स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करुन मराठा समाजातील तरुणांना उद्योजक करण्याचा महामंडळाचा उद्देश पूर्णत्वास जेणे सोपे होईल.

राज्यामध्ये सीएससीचे ७२ हजारापेक्षा जास्त केंद्र कार्यरत असल्याने त्यांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना त्यांच्या गावातूनच पात्रता प्रमाणपत्र कागदपत्र, बँकेचे कर्ज मंजूरी, बँकेचा हप्ता अपलोड करण्यासाठी प्रत्येकी ७० रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली. या करारामुळे लाभार्थ्यांचा वेळ वाचणार आहे, आणि त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. ग्रामीण भागातील उद्योजकतेचा चालना मिळेल. यामुळे सद्यस्थितीत महामंडळाच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या अनधिकृत एजंट लोकांना आळा घालणे शक्य होईल. भविष्यात लाभार्थ्यांसाठी महामंडळाचे मोबाईल ॲप व चॅट बॉट सुविधा सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या नवीन उपक्रमामुळे महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि किफायतशिर होईल, असे मत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी व्यक्त केले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129