
वन्यप्राण्यांनी केलेल्या शेतीपीक नुकसानीचे अनुदान द्या अन्यथा आंदोलनाचा विनायक सरनाईक यांचा इशारा
MH 28 News Live, चिखली : तालुक्यातील शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांकडुन शेतीपीकाचे मोठे नुकसान होत असते तर शेतकऱ्यांनी या सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी ऑनलाइन अर्ज सुद्धा केलेत परंतु ही नुकसानीची मदत प्राप्त झाली नसल्याने शेतकऱ्यांसह स्वाभिमानीने आक्रमक पावित्रा घेतला असुन चिखली तालुक्यातील व गोदरी परीसरातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तात्काळ खात्यावर जमा करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी शेतकऱ्यांसह वनविभागास दिला आहे.
चिखली तालुक्यामध्ये अनेक भागामध्ये त्याचप्रमाणे गोदरी शिवारामध्ये राणडुक्कर, हरीण, रोही या वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांचे सोयाबीन व इतर पिकाचे मोठे नुकसान केले होते. नुकसान भरपाई मिळावी यासाठी सोयाबीन पिक नुकसानीचे आँनलाईन अर्ज देखील शेतकऱ्यांनी सन २०२१ – २२ मध्ये वनविभागाकडे केले आहे. तेव्हा याचे पंचनामे सुद्धा तलाठी, वनपाल व संबंधीत विभागाचे अधिकारी यांच्याकडुन करण्यात आले आहे. अगोदर नैसर्गीक संकटाने शेतकरी ग्रासलेला आहे. आणि त्यातच वन्यप्राणी शेतात रात्रीचा हैदोस घालीत असुन रब्बी व खरीप हंगामात शेतीपीकाचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. महिने उलटुनही वन्यप्राण्यांनी केलेल्या शेती पीक नुकसानीची मदत (अनुदान)
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर प्राप्त झाले नाही. पीक हानी, प्राणी हल्यामध्ये दगावलेली मनुष्य हानी, त्याचप्रमाणे लांडग्यांनी मारलेल्या बकऱ्यांची हानी याचे जिल्ह्यातील एकुण अंदाजे ४२ लाख रुपये रक्कम वनविभागाकडे रखडून पडली आहे. तर दुसरीकडे मात्र इतर तालुक्यात नुकसान भरपाई मिळाली असल्याची ओरड शेतकरी करतांना दिसत आहेत. या महत्वपुर्ण मागण्यांची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असुन तालुक्यातील
शेतकऱ्यांची पिकहानी, प्राणी हल्यात दगावलेल्या बकऱ्यांची नुकसानीची रक्कम तातडीने खात्यावर जमा करण्यात यावी; अर्ज सादर करुनही शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यास विलंब का लागला ? या संपुर्ण प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानीचे विनायक सरनाईक, आमोल मोरे, शुभम पाटील डुकरे, यांच्यासह आदिंनी जिल्हाधिकारी, उप वनसंरक्षक अधिकारी,वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्याकडे दि. २५ मार्च रोजी केली आहे. तर सदर मागण्यांची पुर्तता होवुन शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विनायक सरनाईक, शुभम पाटिल, विठ्ठल परीहार, गणेश देशमुख, श्रीकृष्ण पाटील, सखाराम सोरमारे, सुनील देशमुख, गजानन परीहार, दिलीप मोळवंडे, दिपक महाले, प्रमोद मुळे, पांडुरंग सोळंकी, जगन्नाथ परीहार,यांच्यासह आदी शेतकरी उपस्थीत होते
वन्यप्राण्यांकडुन पिकाची नासाडी
सद्या परीस्थीती पाहता शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन पेरली आहे.तर अनेक झण भाजीपाला व इतर पीक घेत आहेत.रात्रीचे शेतात रोही,हरीण यांचे कळप बसत असल्याने शेतीपीकाची मोठी नासाडी होत असुन या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button