
प्रभा फाळके खूनप्रकरणातील आरोपी बाप – लेकास ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
MH 28 News Live, मलकापूर : येथील गणपती नगर भाग २ मधील रहिवाशी प्रभा फाळके खूनप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या बाप – लेकास पोलिसांनी २ सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रभा फाळके यांचा २९ ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर – बऱ्हाणपूर रोडवर मृतदेह आढळून आला होता.
सदरचा खून झाला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी मलकापूर येथे चौकशीचे चक्रे फिरवून याप्रकरणी गणपती नगर येथीलच रहिवासी विश्वास भास्कर गाढे व मुलगा भार्गव विश्वास गाढे या पिता-पुत्रास १ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले होते. दोन्ही पिता-पुत्राने प्रभा फाळके यांचा लोखंडी रॉड डोक्यात मारून खून करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची कबुली दिली होती. त्यावरून मुक्ताईनगर पोलिसांनी त्या दोघा बाप-लेकास मुक्ताईनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची ६ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक शंकर विठ्ठल शेळके यांनी दिली आहे.