♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नव्या सरकारमध्ये बुलडाण्याला ठेंगा, पश्चिम विदर्भातील पच जिल्हे मिळून फक्त एकच मंत्रीपद

MH 28 News Live, बुलडाणा : मागील एक महिन्यापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज करण्यात आला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या नव्या सरकारमध्ये बुलडाणा जिल्ह्याला प्रतिनिधित्व देण्यात आले नसून पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशीम या पा जिल्ह्यातून केवळ संजय राठोड या एकाच मंत्र्याची वर्णी लागली असल्याने शिंदे – फडणवीस सरकरमध्ये प्रादेशिक असमतोल असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दोन महिन्यांपूर्वी शिवसेना पक्षातून आपली वेगळी चूल मांडत असताना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत शिवसेनेतील काही आमदार घेतले होते. यामध्ये मेहकरचे डॉ. संजय रायमुलकर व बुलढाण्यातील संजय गायकवाड हे दोघे पहिल्या फळीतील आमदार म्हणून त्यांच्यासोबत सुरत आणि नंतर गुवाहाटी येथे गेले होते. त्यामुळे या दोघांपैकी एकाची शिंदे गटातून मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी आशा जिल्ह्यातील जनतेला वाटत होती. या शिवाय या सर्व ऑपरेशनमध्ये जळगाव जामोद येथील भाजपाचे आमदार डॉ. संजय कुटे हे देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय होते त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून त्यांना देखील मंत्रीपद मिळेल असे वाटत होते. याशिवाय चिखलीतील भाजपच्या बहुचर्चित महिला आमदार श्वेताताई महाले यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची आशा भाजपा कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकांना होती. परंतु, ती देखील पूर्ण होऊ शकली नाही.

आज शपथविधी पार पडलेल्या नवीन मंत्रिमंडळामध्ये या सर्व आशा आकांक्षांवर पाणी फेरले गेले. जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले नाही. सध्याच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या जिल्ह्यामध्ये पाच असून यापैकी एकाही आमदाराला मंत्रिपद न मिळाल्यामुळे जिल्ह्यामध्ये फारसा उत्साह आढळून येत नाही. मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे डॉ. राजेंद्र शिंगणे यांना अन्न व औषध प्रशासन मंत्री बनविण्यात आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील त्यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली होती. अडीच वर्षे शिंगणे यांनी हे मंत्रीपद सक्षमपणे सांभाळणे. त्यानंतर जिल्ह्याला पुन्हा एकदा प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा होती मात्र नवीन सरकार मध्ये अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही.

शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा येत्या काळामध्ये विस्तार केल्या जाण्याची सांगितले जात आहे. मात्र भविष्यामध्ये हा विस्तार कधी होतो याबद्दल कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही. या विस्तारात आपल्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा बुलडाणा जिल्ह्यातील जनतेला असली तरी पुढील राजकीय घडामोडींवर हे सर्व अवलंबून आहे. त्यामुळे तूर्तास तरी जिल्ह्याला नवीन मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नसल्याचे म्हणावे लागते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129