♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शेगाव जवळ भीषण अपघात; आजी – आजोबा देखत डंपरने दोघा नातवांना चिरडले, दोघे ठार, संतप्त जमावाने डंपर पेटवले

MH 28 News Live / शेगाव : पळशी सुपो येथून शेगावकडे येणाऱ्या मोटरसायकलला भेंडवळ जवळील माऊली फाटा येथे भरधाव जाणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. यामध्ये मोटरसायकल वरील दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघातानंतर जमाव रस्त्यावर उतरला होता. यानंतर संतप्त जमावाने डंपरला पेटवून दिले होते.

उन्हाळ्याची सुट्यांमध्ये आजी- आजोबांकडे आलेले पार्थ चोपडे (वय ६) व युवराज भागवत (वय ६) असे अपघातात मृत झालेल्या चिमुकल्यांनी नावे आहेत. दरम्यान आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथून प्रकाश महादेव खेडकर आणि साधना प्रकाश खेडकर हे पती- पत्नी आपल्या दोन नातवंडांना घेऊन शेगावकडे निघाले होते.

डंपरची मागून जोरदार धडक

अमरावती येथील पार्थ चोपडे (वय ६) व बडनेरा येथे राहणारा युवराज मोहन भागवत (वय ५) हे दोघे आजी- आजोबांसोबत मोटरसायकलने शेगावकडे निघाले होते. दरम्यान माऊली फाटा येथे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने मोटरसायकलला मागून जोरदार धडक देत चिरडले. धडक जोरदार असल्याने मोटारसायकल वरील चौघेजण रस्त्यावर फेकले गेले. या अपघातामध्ये दोन्ही नातवंडांचा जागीच मृत्यू झाला. तर आजी आणि आजोबा गंभीरित्या जखमी झाली आहेत.

संतप्त जमावाने डंपरला लावली आग

अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र दोन चिमुकल्याच्या मृत्यू जमाव संतप्त झाला होता. यानंतर संतप्त जमावाने डंपरमध्ये आग लावून दिली. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांसह खामगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते. यानंतर आग विझवत जमावाला पांगविले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129