♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आयपीएल सट्टा… फक्त खामगावात कारवाई करून भागणार नाही; संपूर्ण जिल्ह्यातूनच उठवा सट्टेबाजीचा बाजार !

MH 28 News Live, बुलडाणा : भारतीय क्रीडा प्रेमिंचा सर्वात आवडता खेळ असलेल्या क्रिकेटची झटपट आवृत्ती म्हणजे आयपीएल इंडियन प्रीमियर लीग ही होय. ट्वेंटी-ट्वेंटी च्या स्वरूपात खेळवल्या जाणाऱ्या या आयपीएलच्या सामन्यांमध्ये केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेट शौकिनांना गेल्या दशकापासून अक्षरशः वेड लावले आहे मात्र एवढ्यावरच आयपीएलचा प्रभाव मर्यादित नसून या आयपीएलमुळे पूर्वीपासून क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या सट्टेबाजीला आणखीच उधाण आले असून आयपीएलच्या सत्यामध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भारतापासून तर भारताच्या बाहेर देशांमध्येसुद्धा दररोज अब्जावधी रुपयांचा सट्टा लावला जात आहे.

या सट्टेबाजी मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील तरुणाई सुद्धा या सट्टेबाजीच्या विळख्यात अडकले असून या या तरुणांना आयपीएलच्या विळख्यातून बाहेर काढणे गरजेचे आहे.

खामगाव येथे अशाच आयपीएल सध्याच्या ठिकाणी पोलीस पोलिसांनी छापा टाकला व काही तरुणांना मुद्देमालासह अटक केली परंतु एवढे करून भागणार नाही तर जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील सुरू असलेल्या येथील सत्यावर कारवाई करणे गरजेचे आहे असे मत जिल्ह्यातील जनसामान्य व्यक्त होत आहे.

खामगांव शहरातील जलालपुरा भागात आयपीएल २०२० क्रिकेट मैच वर जुगार सुरु असलेल्या ऑफिसवर छापा आज अपर पोलिस अधिक्षक यांच्या पथकाने छापा टाकला. येथे पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग या सामन्यावर जुगार खेळ खेळत व खेळवला जात असल्याने या सट्टा अडयावर महाराष्ट्र जुगार कायद्या प्रमाणे छापा टाकून ०४ आरोपींना जागीच पकडले. या आरोपींकडून क्रिकेट सट्ट्यासाठी वापरण्यात आलेले १२ मोबाईल, एक लेपटॉप, एक टेड इतर साहित्य असा सुमारे ८२०७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सट्टा चालवणार्या मालकासह आरोपी विरुद्ध कलम ४.५ महाराष्ट्र जुगार कायदाप्रमांजे पोस्टे खामगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस विभागाचे दुर्लक्ष

परंतु, एवढ्या एकाच कारवाईवर थांबून चालणार नाही; तर क्रिकेट सट्टेबाजीची जिल्ह्यात खोलवर पसरलेली पाळेमुळे खोदून काढणे हे खरे तर बुलडाणा पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे. कारण, जिल्ह्यातील प्रत्येक प्रमुख शहरात आणि ग्रामीण भागात सुध्दा हे सट्टेबाजीचे लोण खोलवर पसरले आहे. गावोगावी, जागोजागी, आठवडी बाजारात, विशिष्ट ठिकाणी सट्टेबाजाचे तगडे नेटवर्क आहे. हे लोक सराईतपणे आपला बेकायदेशीर धंदा चालवतात. प्रोफेशनल सट्टेबाजांसह अनेक व्यापारी, नोकरदार आणि मुख्यतः युवक वर्ग या नेटवर्कच्या माध्यमातून जुगार खेळत असतो. काही जाणकारांच्या मते जिल्ह्यात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल आयपीएल सट्ट्यामधूध होत आहे. आपल्या खबर्यांमार्फत ही माहिती नक्कीच पोलिसांना मिळत असणार, शिवाय गुप्त वार्ता विभागालाही याबाबत माहिती असणार. मात्र, याकडे पोलीस विभागाचे साफ दुर्लक्ष असल्याचे आजवरच्या किरकोळ कारवायांवरुन म्हणावेसे वाटते.

क्रिकेट सट्टेबाजीचे जाळे आणि दुष्परिणाम

सट्टेबाजीच्या आहारी जाऊन कित्येक लोकांनी आपले आयुष्य उध्वस्त केले असून हजारो जण कर्जबाजारी झाले आहेत. या दृष्टचक्रात भरडलेली अनेक कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली आहेत. बरेचदा सट्टेबाजीमधून वाद उत्पन्न होऊन हाणामारी आणि खूनाचे प्रकार देखील घडतात व सामाजिक सौहार्द बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेता बुलडाणा पोलिसांनी आता धडक मोहीम राबवून अतिशय घातक असलेल्या या क्रिकेट सट्ट्याचा बाजार संपूर्ण जिल्ह्यातूनच उठवावा अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129