
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्यात सर्व सामान्यांच्या तक्रारींचा निपटारा करा – आ. श्वेता ताई महाले
MH 28 News Live, बुलडाणा : लालफितशाहीच्या त्रासातून जनतेला मुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेमधून राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर या वाढदिवसा पासून ते 2 ऑक्टोबर या गांधी जयंती पर्यंत सेवा पंधरवाडा राबवण्याचा निर्णय झाला आहे.
राज्यशासनाने सूचनेनुसार पंतप्रधान राष्ट्र नेता नरेन्द्र मोदी यांच्या वाढदिवसापासून दि. १७ सप्टेंबर २०२२ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दि. २ ऑक्टोबर २०२२ जयंती पर्यंत.
“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आलेला आहे. हा पंधरवाडा सेवा पंधरवाडा म्हणून शासनाने जाहीर केलेला असुन या पंधरवाड्यात शासकिय कार्यालयामध्ये सर्व प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रलंबीत तक्रारींचा निपटारा करण्याचे आदेश दिलेले असून सर्व शासकिय कार्यालयांनी त्यांच्या सर्व प्रलंबित तक्रारींचा निपटारा करून सेवा पंधरवाड्यात आपापल्या विभागाच्या तक्रारी शून्यावर आणण्याचे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी सेवा पंधरवाडा आयोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत केले.
दि . 14/9/2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दि. १७ सप्टेंबर २०२२ ते दि. २ ऑक्टोबर २०२२ या पंधरवाड्यात तक्रारीच्या निपटारा करण्यासाठी संबधित सर्व विभागाची बैठक घेण्यात आली. सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावी याकरीता राज्य शासनाने सन २०१५ ला “आपले सरकार सेवा पोर्टल सुरु केल आहे. त्याच्यातून जनतेची कामे विहित कालमर्यादित पूर्ण होणे अपेक्षित असताना पोर्टलचा आढावा घेतला असता व मंत्रालय स्तरावर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे अवलोकन केले असता अनेक प्रकरणी सबंधित नागरिकांचे अर्ज सक्षम प्राधिकायांकडुन वीहित कालमर्यादेमध्ये निपटारा होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व प्रलंबित संदर्भ/अर्ज / तक्रारी यांचा निपटारा करणेकरिता दि. १७ सप्टेंबर २०२२ दि.२ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत सेवा पंधर वाडा निश्चित केलेला आहे.
प्राप्त झालेल्या व दि. १० सप्टेंबर २०२२ रोजी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जाचा मोहिम स्वरुपात निपटारा करणे अपेक्षित आहे. ज्या तक्रारींचा निपटारा 2 ऑक्टोबर पर्यंत होणार नाही त्या तक्रारीचा निपटारा का झाला नाही ? याचा सकारण अहवाल शासनास संबधित अधिकारी यांनी द्यायचा आहे.
याबाबत आपले सरकार ३९२ सेवा , महावितरण पोर्टल २४ सेवा ३. डी. बी. टी. पोर्टल ४६ सेवा, नागरी सेवा केंद्रामार्फत देण्यात येणा-या शासकीय सेवा, विभागाच्या स्वतःच्या योजनांशी संबंधित पोर्टलवरील प्रलंबित अर्ज २६. याव्यतिरिक्त विविध शासकिय कार्यालयाच्या संबधित विभागाच्या इतर सेवा देणाऱ्या प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणान्या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, कृषि विभाग, आदिवासी विकास विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग, ऊर्जा विभाग तसेच सर्व शासकीय विभागांकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत सेवा विषयी प्रलंबित कामाचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरीता कार्यपध्दती निश्चित करण्यात आली. सदर कार्य पद्धतीची अंगलबजावणीकरिता सर्व संबंधित अधिकान्याना जबाबदारी निश्चित करून देण्यात आली.
पंधरवाड्यात करावयाची अमंबजावणी
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण करणे,
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना – तांत्रिक
अडचणींमुळे प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे , प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे , पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण , विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे शिबिरे आयोजित कडून विवाह नोंदणी प्रमाण पत्र देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे , नव्याने नल जोडणी देणे सामजिक न्याय, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे , बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहिरी करिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे , अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मजूर करणे (अपिल वगळून) , दिव्यांग प्रमाणपत्र देणे, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्र वाटप करणे, भूसंपादन मोबदला देणे, रक्तदान शिबिर, पुतळे स्वच्छता अभियान राबविणे आदी उपक्रम राबविले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे तसेच महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती असल्याने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवडा म्हणून राज्य शासनाने घोषित केलेला आहे. यानिमित्ताने चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त या पंधरवाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये 71 झाडे लावून त्यांचा वाढदिवस मोठ्या साजरा करण्यात येणार आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी व विविध विभागातील शासकीय अधिकारी उपस्थित होते.