
शेवटचे दोन दिवस उरले… पीएम किसान सन्मान योजना लाभार्थ्यांना E KYC बंधनकारक
MH 28 News Live : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २ हजार रुपयांच्या ३ समान हप्त्यांत प्रतिवर्षी ६ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवली जातेय. जानेवारीमध्ये पहिला हप्ता मिळाल्यानंतर दुसरा हप्ता एप्रिलमध्ये मिळण्याची शक्यता असल्याने संबधित शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्यासाठी वेबसाईटवर ३१ मार्च आगोदर एक महत्वाची प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
सध्या पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत कागदपत्रामध्ये काही बदल केले होते. त्यानुसार मधील काळामध्ये सरकारने आता या योजनेत रेशन कार्ड देणं बंधनकारक केले आहे. पात्र शेतकऱ्यांना त्यांचा रेशन कार्ड क्रमांक, आधार कार्डची सॉफ्ट कॉपी, बँक पासबुक आणि घोषणापत्र सबमिट करणे गरजेचे आहे. तसेच, या कागदपत्राशिवाय या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, आता सरकारने लाभार्थ्यांसाठी केवायसी बंधनकारक केलं आहे. अनेक अपात्र नागरिक या सरकारी योजनेचा लाभ घेत होते, असे निदर्शनास आल्याने सरकारने प्रत्येकासाठी ई – केवायसी (e KYC) बंधनकारक केलं आहे. तुम्ही हे केवायसी केलं नाही, तर ११ व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत. तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला ३१ मार्चपर्यंत केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे केवायसी तुम्ही घरी बसून ऑनलाइनही करता येणार आहे. दरम्यान, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि या योजनेचा पुढचा हप्ता वेळेवर तुमच्या खात्यात जमा व्हावा, अशी तुमची इच्छा असेल तर केवायसी पूर्ण करणे महत्वाचे आहे.
असं करा ई-केवायसी (e KYC) –
▪️ प्रथम या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
▪️ तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्यात e-KYC चा पर्याय दिसेल.
▪️ तुम्हाला या e-KYC वर क्लिक करावं लागेल.
▪️ आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
▪️ यानंतर तुम्हाला ईमेज कोड टाकावा लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावं लागेल.
▪️ आता तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल आणि OTP भरावा लागेल.
▪️ यानंतर, तुमची सर्व माहिती पूर्णपणे बरोबर असल्यास ही eKYC प्रक्रिया पूर्ण होईल.
▪️ तुमची प्रक्रिया चुकली असेल, तर invalid असं स्क्रीनवर येईल.
▪️ चुकलेली माहिती तुम्ही आधार सेवा केंद्राला भेट देऊन दुरुस्त करून घेऊ शकता.