
संजय राऊत यांच्या जामिनाचा लोणारमध्ये जल्लोष
MH 28 News Live, लोणार : उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे खासदार तथा पक्षाचे बुलंद तोफ शिवसेना नेते संजय राऊत यांना मागील तीन महिन्यांपूर्वी पासून ईडी ने पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात अटक केली होती त्यांना दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला त्यांना जामीन मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शहर प्रमुख गजानन जाधव व युवा सेना शहर अध्यक्ष श्रीकांत मादनकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके फोडून व पेढे वाटप करून जल्लोष साजरा केला. या वेळी माजी नगरसेवक शाम राऊत, शहर उपाध्यक्ष कैलास अंभोरे, तानाजी मापारी, भारत राठोड, फकीरा डेंगले यांच्यासह शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.
या वेळी बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना शहर प्रमुख गजानन जगदेवराव जाधव म्हणाले की आमचे नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने खोट्या नाट्या प्रकरणात अडकून त्यांनी जे भाजपा सरकारची पोल खोल सुरू केली होती त्या वर अंकुश लावण्याच्या प्रयत्न केला. परंतु न्यायालयाने त्यांना जामीन देत त्यांच्या अटकेवर ताशेरे ओढले व जामीन मंजूर केला. त्यामुळे सत्य कितीतरी दाबले तरी ते एक ना एक दिवस उजागर होत असून सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही याची प्रचिती देत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे नेते यांची तोफ पुन्हा धडाडणार असल्याने तमाम उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसैनिकांमध्ये मध्ये आनंदाचे वातावरण आहे.