
डीजेचा आवाजावरून डोणगावात पेटले भांडण, लग्नघरातले मायलेक जखमी, ८ लोकांवर गुन्हे दाखल
MH 28 News Live, डोणगाव : स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम बेलगाव येथे २० मेच्या रात्री ८ वाजता दरम्यान घरासमोर लावलेला डीजेचा आवाज कमी करण्यासाठी सांगितले असता ८ लोकांनी फिर्यादिस मारहाण केली. ज्यात फिर्यादीचा हात मोडला तर फिर्यादीच्या आईचा पाय मोडला. यासंदर्भात डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये ८ लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्राम बेलगाव येथील श्रीराम मणीराम चव्हाण यांच्या मुलाचे लग्न २२ मे रोजी असल्याने त्यांच्या घरी पाहूणे आलेले होते. अश्यात २० मे च्या रात्री ८ वाजता त्यांच्या घरासमोरील सुरेश मखराम राठोड यांनी दारात मोठ्या आवाजात डीजे लावून त्यावर गाणे वाजवत होते. तेव्हा फिर्यादी यांनी डीजेचा आवाज कमी करा आमच्या घरी लग्न असून पाहूणे आलेले आहेत, आवाजाने त्रास होतो असे सांगून परत घरी आले. त्यानंतर आरोपी सुरेश राठोड, अनिल राठोड, दर्शन चव्हाण, कैलास राठोड, करण राठोड, केवल राठोड, मोहन राठोड, विनोद राठोड यांनी लाठ्या काठ्या घेऊन आले व भांडायला सुरवात केली. या भांडणात फिर्यादीच्या डोक्यात घातलेली लाठी ही फिर्यादीने हातावर झेलली. त्यामुळे फिर्यादीचा हात तुटला, तर फिर्यादीची आई माहुबाई ही भांडण सोडवण्यासाठी आली असता यातील एका आरोपीने त्यांच्या पायावर दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांच्या पायाचे हाड मोडले तर एका आरोपीने कुऱ्हाड घेऊन आला मात्र लग्नाला आलेल्या पाहूण्याने मध्यस्थी करून भांडण सोडवले.
यावर फिर्यादी श्रीराम चव्हाण यांनी डोणगाव पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादी नुसार ८ लोकांच्या विरुद्ध 143, 144, 147, 148, 149, 323, 324, 325, 336, 504, 506 नुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.