
“गावातून स्टेशनरी घेवून येते ” असं सांगून ‘ ती ‘ युवती दोन दिवसांपासून बेपत्ता
MH 28 News Live, जळगाव जामोद : तालुक्यातील पळशी सुपो येथील रहिवाशी कु. नेहा उर्फ चिमु संतोष राखोंडे (२०) या युवतीला डि.एड. द्वितीय वर्षांच्या परिक्षेकरीता शहरातील जि.प. हायस्कुल हे परिक्षा सेंटर मिळाले होते. त्यामुळे ती अमृतनगर भागात खोलीत मैत्रीणी सोबत राहत होती.
१७ जानेवारी २३ रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास रूम पार्टनर मैत्रीणीला ” गावातून स्टेशनरी घेवून येते ” असे म्हणून खोलीतून निघुन गेली. बराच वेळ झाल्यानंतरही परत आली नाही. त्यामुळे तिचा सर्वत्र शोध घेतला. मिळून न आल्याने याप्रकरणी जयराम नामदेव राखोंडे (७१) रा. पळशी सुपो यांनी शहर पोस्टेला काल १८ जानेवारी २३ रोजी फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी बेपत्ताची नोंद घेतली असून पुढील तपास एएसआय वरखेडे करीत आहेत.