
दिलीप परसने यांची महाराष्ट्र मासेमारी अधिनियम सुधारणा समितीवर नियुक्ती
MH 28 News Live, चिखली : येथील आदर्श विद्यालय येथे कार्यरत आदर्श शिक्षक दिलीप दत्तात्रय परसने (केवट) यांची महाराष्ट्र मासेमारी बाबत १९६० अधिनियम सुधारणा समिती मध्ये सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. याबद्दल परसने यांचे समस्त महाराष्ट्र राज्य केवट समाज महासंघ, केवट समाज सेवा समिती, आदर्श विद्यालय परिवार चिखली व समस्त मासेमारी वर्गातून कौतुक होत आहे.