♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार ग्रामसेवा सोसायट्यांच्या नव्या संचालकांचा सत्कार; उपस्थित राहण्याचे केले राहुल बोंद्रै यांनी आवाहन

MH 28 News Live, चिखली:
अनुराधा अर्बन बॅंकेच्या वतीने चिखली विधानसभा मतदार संघातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीतील नवनियुक्त अध्यक्ष व संचालकांच्या सत्कार आयोजित करण्यात आले आहे. जिल्हयाचे पालकमंत्री नामदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिका-यांना गौरविण्यात येणार असुन इतर मान्यवरांचीही उपस्थिीती लाभणार आहे. दि. ८ एप्रिल रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन अनुराधा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केेले आहे.

चिखली येथील मोैनीबाबा संस्थानच्या सभागृहात दि. ८ एप्रिल रोजी ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या नवनियुक्त अध्यक्ष व संचालक मंडळाच्या सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रम प्रसंगी चिखली मतदार संघातील ८० हुन अधिक गामसेवा सहकारी संस्थेच्या पदाधिका-यांचा सत्कार बुलडाणा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळयाला माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, रेखाताई खेडेकर, माजी जि.प.अध्यक्ष प्रा. नरेंद्र खेडेकर, एकनाथराव थुटे, सुधाकरराव धमक, बाजार समितीचे मुख्य प्रशासक नंदकिशोर सवडतकर, जि. प. सभापती ज्योती पडघान, बुलडाणा प.स.सभापती उषाताई चाटे, माजी सभापती प्रकाश निकाळजे, तालुका अध्यक्ष समाधान सुपेकर, नंदकिशोर शिंदे, आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिीती राहणार आहे.

सहकार चळवळीच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला गती देवून बळीराजाचे हित साधण्याची, सहकार चळवळीला बळकटी देण्याची अत्यंत महत्वाची भूमीका ग्रामसेवा सहकारी संस्था पार पाडत असतात. अश्या महत्वाच्या संस्थेवर संचालक म्हणुन निवड होणे, ही भाग्याची बाब आहे. त्यानिमित्ताने ० टक्के थकीत प्रमाण ठेवीत सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटविणा-या अनुराधा अर्बन को.ऑप बॅंकेने नवनियुक्त पदाधिका-यांच्या सत्काराचे आयोजन केेले आहे. तरी या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन अनुराधा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केेले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129