♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, सहा प्रवासी जखमी

 

MH 28 News Live / डोणगाव : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात गौरव पांडे या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य ५ ते ६ प्रवासी जखमी झाले. नागपूरहून मुंबईकडे जाणारी एमएच ०९ जीजे ७३१५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक २९६.०५ येथे आली असता चालक शिवानंद हांचिनायटी (वय ३५, रा. नागपूर) याने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसवरील नियंत्रण सुटल्याने ती लोखंडी दुभाजकावर आदळून दोन दुभाजकांच्या मधोमध अडकली. या धडकेत गौरव पांडे बसमधून बाहेर फेकले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वाकी समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे कर्मचारी, पोलीस आणि एमएसएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी हलविले. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाही सुरू आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129