
चिखलीच्या यात्रेत बेकायदा धारदार शस्त्र बाळगणार्या दोन युवकावर गुन्हा दाखल
MH 28 News Live , चिखली : रेणुका माता मंदिर परिसरात पेट्रोलिंग ड्युटी करत असताना दोन युवकाजवळ बेकायदेशीररित्या एक धारदार खंजीर आणि तलवार आढळून आल्याने या दोघांविरुध्द. गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी आहे की, दि. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ . ३० वाजता रेणुका देवी मंदिर परिसरात यात्रेनिमित्त पेट्रोलींग करत असताना पोलीस हेड काँस्टेबल प्रमोद साळवे यांना विशाल उर्फ डुबऱ्या राजेश दांडगे वय २१ वर्ष रा. गांधीनगर चिखली याच्या जवळ धारदार सुरा आढळून आला. याशिवाय महेश जगदीश खुणारे वय 24 वर्ष रा. आनंद नगर चिखली याच्याकडे विनापरवाना तलवार आढळली. दोन्ही युवकांनी ही हत्यारे विनापरवाना जवळ बाळगल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याच्या विरोधात शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.



