
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी 20 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे
MH 28 News Live, बुलडाणा : दरवर्षी शिक्षक दिनानिमित्ताने प्रातिनिधीक स्वरूपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सन 2022 च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार https //nationalawardstoteacher.education.gov.in या वेबपोर्टलवर नाव नोंदणी सुरू झाली असून या पोर्टलवर इच्छूकांनी 20 जूनपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकूंद यांनी केले आहे.