♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आंतरराष्ट्रीय महिला दिन ? जाणून घ्या काय आहे त्याचा इतिहास आणि महत्व

MH 28 News Live : आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्चला साजरा केला जातो. महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस लैंगिक समानता, महिलांसाठी समान हक्क, हिंसा आणि महिलांवरील अत्याचार यासारख्या तातडीच्या विषयांवर लक्ष केंद्रित करतो. सर्व प्रकारच्या महिलांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्चला साजरा केला जातो. महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस लैंगिक समानता, महिलांसाठी समान हक्क, हिंसा आणि महिलांवरील अत्याचार यासारख्या तातडीच्या विषयांवर लक्ष केंद्रित करतो. सर्व प्रकारच्या महिलांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

काय आहे महिला दिनाचा इतिहास ?

महिला दिनाची सुरुवात एका आंदोलनापासून झाली होती. खरतरं १९०८ साली अमेरिकेत मजदूर आंदोलन झाले होते. या आंदोलनात अनेक महिला आपल्या हक्कासाठी सहभागी झाल्या होत्या. यात नोकरी करणाऱ्या महिलांची आपल्या कामाचे तास कमी करण्याची आणि आपला पगारवाढ करण्याची मागणी होती. यासोबतच महिलांना मतदानाचा अधिकार देण्याची मागणी करण्यात आली होती. मग आंदोलन करणाऱ्या महिलांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचला, त्यानंतर एक वर्षानंतर १९०९ मध्ये अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली. हा दिवस पहिल्यांदा २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क शहरात साजरा करण्यात आला होता.

८ मार्च रोजी या दिवसाचा उत्सव कसा सुरू झाला ?

आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला संमेलन ऑगस्ट १९१० साली स्थापन केले गेले. त्याच वेळी, जर्मनीने ८ मार्च १९१४ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. १९७५ मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९७७ मध्ये हा दिवस दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

काय आहे या दिवसाचं महत्व
आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेषत: जगभरातील महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि लैंगिक असमानतेबद्दल जागरुकता वाढवतो. या दिवशी प्रत्येकाने आपल्या समाजातील महिलांचे कर्तृत्व ओळखण्याच्या मार्गांचा विचार केला पाहिजे. मुलींच्या शिक्षणात आणि समाजातील सर्व घटकांमधील लैंगिक भेदभाव दूर करणे आवश्यक आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129