
वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ गरजू व खऱ्या आदिवासीना द्या – भगवानराव कोकाटे
MH 28 News Live, लोणार : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला येथील प्रकल्पस्तरीय नियोजन आढवा समितीची बैठक दिनांक ११ मार्च रोजी आदिवासी विकास प्रकल्प कार्यलय अकोला येथे दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती. वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ गरजू व खऱ्या आदिवासीना द्या अशी मागणी या बैठकीत आदीवासी नेते भगवानराव कोकाटे यांनी केली.
बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्हातील सर्व आदिवासी बांधवाना वयक्तिक किंवा कार्यालयीन अडचणी असल्यास प्रत्यक्ष भेटावे अथवा मोबाईलवर संपर्क करून कळावे असे आवाहन प्रकल्प समितीच्या अध्यक्षा नंदिनी टारपे व सदस्य यांनी केले होते.
अकोला आदिवासी कार्यालयाच्या अध्यक्ष नंदिनी टारपे यांच्या अध्यक्षतेखाली मार्च महिन्यातील मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्पाअंतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्हाच्या नियोजनला दिलेल्या निधीचा आढवा घेण्यात आला. आदिवासी विभागाचा निधी प्रत्यक्ष कुठे खर्च केला आहे आणि कुठे खर्च करणार आहे याची माहिती घेण्यात आली; तसेच विभागाचा निधी परत न जाऊ देता खर्च करण्यात यावा, व बुलडाणा येथील आदिवासी वसतिगृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे, या वर तक्रार देऊन सुद्धा का थांबवण्यात आले नाही, यावर चर्चा करून तात्काळ बांधकाम थांबवण्यात यावे असासर्वनुमते ठराव घेण्यात आला.
यावेळी प्रकल्प समितीचे सदस्य तथा बिरसा क्रांती दलाचे जिल्हाअध्यक्ष भगवानराव कोकाटे यांनी तिन्ही जिल्यातील योजना व कामांबाबत विषय मांडले. नवीन योजनांच्या जाहिराती दिल्या त्यामध्ये खऱ्या आदिवासींना लाभ देऊन देण्यात यावे असे मत त्यांनी व्यक्त केले. या बैठकीला सर्व सदस्यनी ऐन वेळी येणाऱ्या सर्व विषयावर चर्चा केली. यावेळी प्रकल्प समितीचे सचिव तथा प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे, भगवानराव कोकाटे, अजबराव उईके, शोभाताई डाखोरे, सचिन पालकर, अनिल सुरत्ने आदी सदस्य हजर होते.