
वास्तुशास्त्रानुसार घरात घड्याळ कुठं असावं? दिशा चुकली की गडबडतात इतक्या गोष्टी
MH 28 News Live : वास्तुशास्त्रानुसार, घड्याळाचे काम फक्त वेळ दाखवणे नाही. त्याच्याशी संबधित आपल्याला अनेक संकेत मिळतात, ज्याचा घरातील सदस्यांवर चांगलाच परिणाम होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ कधीही लावू नये. याचा घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याशिवाय घड्याळ दक्षिण दिशेला ठेवल्याने आर्थिक चणचण वाढते.
घड्याळ पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने तुमच्या घरात समृद्धी आणि प्रगती वाढते.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर घड्याळ कधीही लावू नये. असे केल्याने घरात नकारात्मक उर्जेचा संचार वाढतो. घरात राहणाऱ्या लोकांच्या सुखाला वाईट नजर लागते, असे मानले जाते.
आजकाल घर सजवण्यासाठी विविध प्रकारची घड्याळे आली आहेत. त्यापैकी एक म्हणजे पेंडुलम घड्याळ. अर्थात, पेंडुलम असलेले घड्याळ खूप सुंदर दिसते, परंतु ते घरात ठेवल्याने सुख-समृद्धी थांबते, असे मानले जाते. याशिवाय घरात कधीही बंद घड्याळ ठेवू नये. तसेच, घड्याळावर धूळ बसू देऊ नये. घरात केशरी आणि हिरव्या रंगाचे घड्याळ लावू नये. ही दोन्ही रंगीत घड्याळे घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, असे मानले जाते.
– वास्तुशास्त्रानुसार घराच्या दिवाणखान्यात चौकोनी आकाराचे घड्याळ लावणे फायदेशीर ठरते.