♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘ द कश्मीर फाइल्स ‘ बद्दल कंगना राणावत हे म्हणाली…

MH 28 News Live : तिस वर्षांपूर्वी काश्मीर खोर्यात तेथील हिंदूंचा अतोनात छळ करून त्यांना जबरदस्तीने स्थलांतर करण्यास भाग पाडणार्या धर्मांध मुस्लिम अतिरेक्यांच्या कारवायांचे दाहक वास्तव मांडणारा द कश्मीर फाइल्स हा चित्रपट देशात सर्वत्र प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर बाँलिवुड अभिनेत्री कंगना राणावत हिने व्यक्त केलेली प्रतिक्रिया देखील अशीच गाजते आहे.

गेल्या काही काळात हिंदी चित्रपट स्रुष्टीमध्ये घडलेल्या घटना आणि घडामोडींवर एरवी तिखट शब्दात प्रतिक्रिया देणारी कंगना राणावतने ‘द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे मात्र भरभरून कौतुक केले. यावेळी तिने फिल्म इंडस्ट्रीतल्या इतर कलाकारांनाही टोला लगावला. ” उंदरासारखं बिळात लपून बसलेल्यांनी बाहेर यावं आणि या चित्रपटाचं प्रमोशन करावं “, अशा शब्दांत तिने बॉलिवूडकरांना टोमणा मारला आहे. कंगनाच्या प्रतिक्रियेचा हा व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. १९९० मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. या चित्रपटात अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती यांसह इतरही नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत.

कंगना नेमकं काय म्हणाली ?

” ‘ द काश्मीर फाईल्सच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. त्यांनी पूर्ण फिल्म इंडस्ट्रीचे जेवढे पाप होते, ते सर्व पाप धुवून टाकले आहेत. बॉलिवूडचेही पाप त्यांनी धुवून टाकले. हा चित्रपट इतका कौतुकास्पद आहे की जे इंडस्ट्रीवाले आपल्या बिळात लपून बसले आहेत, त्यांनी बाहेर येऊन याचं प्रमोशन केलं पाहिजे. नेहमी ते बकवास, सडलेल्या चित्रपटांचं प्रमोशन करतात “, असं ती म्हणाली.

महत्त्वाचे म्हणजे ‘ द काश्मीर फाईल्स ‘ बद्दल कंगनाने पहिल्यांदाच वक्तव्य केलेलं नाही. याआधीही तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली होती.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129