♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दि चिखली अर्बन विद्यानिकेतन (CBSE) शाळेचे नॅशनल जंप रोप स्पर्धेत घवघवीत यश

MH 28 News Live, चिखली : नाशिक येथे दि ४ मार्च २०२२ ते ६ मार्च २०२२ या कालावधीत १८ वी राष्ट्रीय सब जुनिअर व सिनियर जम्परोप अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, हरियाणा, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आसाम अशा विविध राज्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. महाराष्ट्र राज्याच्या सब ज्युनिअर व सिनियर जंप रोप स्पर्धेच्या चमू (समूह) मध्ये दि चिखली अर्बन विद्यानिकेतन (CBSE ) शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याच्या समूहात सहभागी होऊन आपला सहभाग नोंदविला होता.

 

सदर स्पर्धेसाठी ‘शाळेतील इयत्ता ६ वी चे विद्यार्थी विष्णू भिसे, तेजस इंगळे व पवन वाघमारे तसेच मुलीच्या गटामध्ये कोमल लठाड, माधुरी शिंदे व आरती करवते यांनी आपल्या खेळाचे प्रदर्शन करून परिश्रम, सराव, आत्मविश्वासाच्या आधारावर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत मुलांच्या गटाने रौप्य पदक तर मुलींच्या गटाने कांस्यपदक प्राप्त करून दि चिखली अर्बन विद्यानिकेतनचे नाव लौकिक केले आहे.
दि चिखली अर्बन विद्यानिकेतन येथे नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात येत असतो. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना ओळखून त्याला चालना देण्याचे कार्य केले जाते. त्याच बरोबर आजच्या काळात खेळाचे महत्व लक्षात घेऊन शाळेत विद्यार्थ्यासाठी दररोज खेळाची एक तासिका देऊन प्रत्येक विद्यार्थ्याला विविध खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. त्या माध्यमातून शाळेचे विद्यार्थी देश पातळीवर यश संपादन करून ‘शाळेचे व स्वतःचे नाव राष्ट्रीय;पातळीवर घेऊन जातील, या साठी त्यांना प्रेरित केले जाते.

 

शाळेच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या यशाबद्दल दि चिखली अर्बन विद्यानिकेतनचे अध्यक्ष सतीश गुप्त, शाळेचे सर्व संचालक मंडळ तसेच शाळेच्या शैक्षणिक संचालिका डॉ पूजा गुप्ता, शाळेचे प्राचार्य गौरव शेटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक ज्ञानेश तळेले , प्रशिक्षक माधव मंडळकर, प्रभाकर जाधव व भूषण मंडळकर यांचे मार्गदर्शन लाभले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129