
रोजगार वार्ता – भारतीय रेल्वेत बंपर भरती; २९७२ जागा भरणार
MH 28 News Live : भारतीय रेल्वेत बंपर भरती करण्यात येणार आहे. पूर्व रेल्वेने विविध ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसंदर्भात नवीन अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ११ एप्रिल २०२२ पासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मे २०२२ आहे. भारतीय रेल्वेद्वारे शिकाऊ पदासाठी भरती निवड प्रक्रियेच्या आधारावर केली जाईल.
अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेद्वारे हावडा विभाग, लिलुआह वर्कशॉप, सियालदह विभाग, मालदा विभाग, जमालपूर वर्कशॉप, आसनसोल विभाग, कांचरापारा कार्यशाळेत फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, सुतार, पेंटर, टर्नर, इलेक्ट्रीशियन आणि वायरमन यासह एकूण २९७२ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट rrcer.com ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : ११ एप्रिल २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० मे २०२२
पात्रता
शिकाऊ उमेदवाराच्या या पदांसाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराकडे नॅशनल काउंन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगने जारी केलेल्या संबंधित राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवारांचे वय १५ ते २४ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
अर्जाची फी
पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट rrcer.com वर जाऊन ११ एप्रिल ते १० मे २०२२ या काळात ऑनलाइन अर्ज करता येईल. ओपन आणि ओबीसी उमेदवारांकडून 100 रुपये अर्जाचे शुल्क आकारले जाईल.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button