
सैलानीत आढळला अनाेळखी व्यक्तीचा मृत्यू
MH 28 News Live, रायपूर : सैलानी दर्गाच्या बाजूला असलेला एका शेतात ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह काल, २३ मार्चला मिळून आला.
या प्रकरणी रायपूर पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. मृतक व्यक्तीचा रंग काळा असून, उंची अंदाजे पाच फूट आहे. चेहरा लांबट, डोक्यावर काळे केस, अंगात हिरव्या रंगाचे फुल बाह्यांचे शर्ट व चौकडी भुरकट रंगाची पॅन्ट परिधान केलेली आहे. तपास रायपूर पोलीस करीत आहेत.



