♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

काय असावा उन्हाळ्यातला आहार…? जाणून घ्या सुदृढ आरोग्यासाठी

MH 28 News Live : उन्हाळा आला की सगळे लोक थंडावा मिळावा म्हणून म्हणून काय खायला पाहिजे याचा विचार करतात. उन्हाळ्यात पचन संबंधित आजार उद्भवू शकतात म्हणून तेव्हा हलके अन्न खाणे, जास्त पाणी पिने आवश्यक आहे. उन्हाळ्यात चरबीयुक्त आणि तळलेले पदार्थ खाने टाळा. ओट्स, बार्ली आणि गव्हाच्या पदार्थांचा समावेश तुमच्या आहार करा. आणखी काही पदार्थ आहेत ज्यांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात उन्हाळ्यात करू शकतात. जेणे करून तुमच्या शरीरातील उष्णाता ही कमी होईल. कोणत्या पदार्थांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात केला नाही पाहिजे, चला जाणून घेऊया त्या पदार्थांबद्दल…

हे खा आणि प्या !

नारळपाणी- नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. सोबतच आपल्या पोटातील आम्लाची पातळी कमी होते.

दही – शरीराला थंडावा मिळण्यासाठी दही सगळ्यात चांगली आहे. दह्यामुळे अन्न पचनासा मदत होते. जर रोज दही खायला कंटाळ येतो तर ताक पिणे गरजेचे आहे.

थंडगार औषधी वनस्पती: पुदीना, पेपरमिंट सारख्या औषधी वनस्पती आपल्या पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतात.

पाण्याने समृद्ध फळे आणि भाज्या: उन्हाळ्या आला की कलिंगड, खरबूज, स्ट्रॉबेरी आणि पीच ही फळे बाजारात उपलब्ध असतात. ही फळे खाल्याने तुमच्या शरीरातील उष्णाता कमी होईल. भाज्यांमध्ये काकडी खाल्याने देखील शरीरातील उष्णता कमी होते.

आईस टी: आईस टी प्यायल्याने आपले वजन वाढते. आईस टी प्यायल्याने पाणी पिणे कमी होते. दिवसातून कमीत कमी आपण ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे,म्हणूनच आईस टी पिणे टाळा जेणेकरून तुम्ही पाणी जास्त प्याल.

हे खाणे टाळा…

बर्गर आणि हॉट डॉग्स – बर्गर, फ्राईज आणि हॉट डॉग्समध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते. यामुळेच आपले वजन वाढते. हे सगळे अन्न पचविणे कठीण आहे, म्हणून हे सगळे खाने टाळणे चांगलेच आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129