
चार दिवसांपासून झाले आणि प्रेत विहीरीत आढळले
MH 28 News Live, बुलढाणा : ४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आज, ३१ मार्च रोजी माळविहिर ( ता बुलडाणा) येथील एका विहिरीत आढळून आला. राजू पुंजाजी लोखंडे ( ४७, रा माळविहिर) असे मृतकाचे नाव आहे.
राजू लोखंडे हे २६ मार्चला घरी कुणाला काहीही न सांगता निघून गेले होते. त्यांचा शोध घेऊनही ते न सापडल्याने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात २७ मार्चला बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती.
दरम्यान आज, ३१ मार्च रोजी माळविहिर येथील तलावाजवळ असलेल्या एका विहिरीत राजू लोखंडे यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. तपास बुलडाणा शहर पोलीस करीत आहेत



