सैलानी नगरमधील टिपू सुलतान चौकाची पाटी आणि ओटा हटवा – चिखली भाजपची मागणी
MH 28 News Live, चिखली : शहरातील सैलानीनगर भागामध्ये काही असमाजिक तत्त्वांकडून टिपू सुलतान चौक अशी पाटी लावून तेथे ओटा बांधण्यात आल्यामुळे या भागातील सामाजिक शांतता व सौहार्द धोक्यात आले आहे. याचाच परिणाम म्हणून काल येथे किरकोळ वादावरून दगडफेकीचा प्रकार देखील घडला; यापुढे असे असामाजिक प्रकार घडू नये याकरिता खबरदारी म्हणून सदर टिपू सुलतान चौकाची पाटी आणि ओटा त्वरित काढून टाकण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन पक्षाचे शहराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या नेतृत्वात चिखली पोलीस ठाणेदार भूषण गावंडे यांना दि. १७ मे रोजी सादर करण्यात आले.
गेल्या दोन महीन्यापूर्वी सैलानीनगर येथे औटयाचे बांधकाम करून ‘ टिपू सुलतान चौक’ अशी पाटी लावण्यात आली आहे. हे काम एका विशिष्ट समुहाकडुन करण्यात आले. या ठिकाणी चौक स्थापन करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे त्या भागातील शांततेचे वातारण सतत बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचा परिणाम म्हणजे काल दि. १६ मे रोजी सायकाळी तेथे होणाऱ्या लग्न समारंभात डी. जे सुरू असताना या चौकात गाणे वाजवे नका असे सांगून एका विशिष्ट समुहाकडुन लग्न मंडळी सोबत वाद घालण्यात आला व त्या भागातील लोकांवर दगडफेक करण्यात आली. त्यात अनेकजन गंभीर जखमी झाले आहे तरी या घटनेला कारणीभूत असलेले ओटा व टिपू सुलतान चौकाची लावलेली पाटी त्वरित काढण्यात यावी तसेच ती लावणाऱ्या आणि त्या भागात दगडफेंड करून वातावरणा खराब करणाऱ्या संबधीतावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाची प्रतिलिपी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक व तहसिलदार यांना देण्यात आल्या आहेत. पंडीतराव देशमुख, डॉ. प्रतापसिंह राजपूत, सुभाषअप्पा झगडे, विजय नकवाल, नामू गुरूदासानी, गोविंद देव्हडे, विजय वाळेकर, नितीम गोराडे,
आणि भारत दानवे, सागर पुरोहित, वीरेंद्र वानखेडे, संतोष काळे, मनीष गोंधने, अक्षय भालेराव, हरीभाऊ परिहार शैलेश सोनूने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button