♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हेच का कायद्याचे राज्य ? मुख्याधिकारी म्हणतात पोलीस संरक्षण मिळाले तरच अतिक्रमण काढू !

MH 28 News Live : स्थानिक MSEB चौकाचे चालू असलेले सुशोभिकरण आणि विकासकाम पूर्ण करण्यापूर्वी सदर चौकात येऊन मिळणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण काढावे अशी मागणी करणाऱ्या नागरिकांना ” पोलीस संरक्षण मिळाले तरच अतिक्रमण काढू अन्यथा आम्ही त्या अतिक्रमणाला हात सुध्दा लावणार नाही ” अश्या शब्दात उत्तर देणारे चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या बेजबाबदार विधानामुळे हेच का कायद्याचे राज्य ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

सविस्तर विषय असा आहे की शहरातील जांबुवंती नदीच्या पुलावरील जुना बुलढाणा मार्गावर महावितरण चौकाचे सुशोभिकरण सुरू आहे परंतू, प्रशासनाकडून मिळालेल्या तोंडी माहीतीनूसार जुना बुलढाणा मार्ग जवळपास ८० फूट रुंदिचा असून देखील येथे बोकाळलेल्या अतिक्रमणामुळे आज रोजी मात्र या रस्त्याची रुंदी जेमतेम ४० फूट भरते. विकासकामे करत असतांना शासनाचे करोडो रुपये खर्च होतात, ते व्यर्थ जाऊ नये आणि त्याची उपयोगीता योग्य रीतीने होण्याकरिता सदर चौकात असलेले अतिक्रमण आधी १०० टक्के काढुन टाकावे आणि नंतरच त्या ठिकाणी चौकाचे सुशोभिकरण करण्यात यावे, MSEB चौकात होणारे सौंदयकरणाचे कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे तसेच काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची पार्श्वभूमी पाहता ज्यामुळे समाजात तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही या करिता सदर चौकात कोणत्याही प्रकारचे झेंडे, विशेष समाजाचे नामकरण व प्रतिमा ठेवू नये अश्या मागण्या एका निवेदनाद्वारे सकल हिंदू समाज तसेच सदानंद नगरवासी यांनी दि. १० जून रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या होत्या.

निवेदनकर्त्यांची मुख्याधिकाऱ्यांवर नाराजी

या निवेदनाच्या प्रतिलिपी तहसीलदार, मुख्याधिकारी आणि ठाणेदार यांना देखील देण्यात आल्या होत्या. आपण दिलेल्या निवेदनावर काय कार्यवाही झाली याची चौकशी करण्यासाठी निवेदनकर्त्यांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांची दि. १३ जून रोजी भेट घेतली असता कुरवाडे यांनी निवेदनकर्त्यांनाच मुर्खात काढले. ” तेथील अतिक्रमण हटवा असे सांगणारे तुम्ही कोण त्या चौकातलं अतिक्रमण काढायचं असेल तर आम्हाला पूर्ण गावातल्या अतिक्रमण काढावं लागेल ” अशा शब्दात कुरवाडे यांनी निवेदनकर्त्यांची संभावना केली. एखादा प्रशासकीय अधिकारी अतिक्रमणाचे कसे समर्थन करू शकतो व अतिक्रमण काढा अशी मागणी करणाऱ्या नागरिकांनाच उलट कशी दमदाटी करू शकतो याचे हे उदाहरण म्हणावे लागेल. मुख्याधिकारी कुरवाडे यांच्या अश्या उत्तरामुळे निवेदनकर्ते मात्र संतप्त व नाराज झाले.

मुख्याधिकारी कुरवाडे यांचा खुलासा

यासंदर्भात MH 28 News Live ने कुरवाडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल माहिती घेतली असता पोलीस संरक्षण मिळाल्याशिवाय तेथील अतिक्रमण काढणार नाही, आम्ही चिखली पोलीस ठाण्याकडे संरक्षण पुरवण्याची मागणी करु आणि ती मंजूर होऊन पोलीस कुमक बंदोबस्तासाठी मिळाली तरच हे अतिक्रमण काढू ” असे आपण निवेदनकर्त्यांना सांगितल्याची माहिती मुख्याधिकारी कुरवाडे यांनी दिली

निवेदनकर्त्यांनी दिला इशारा

पूर्वीच आम्ही आपणास आवगत करित आहोत. भविष्यात मार्गावरिल अतिक्रमण काढुन झाल्यावर चौकात झालेले सुशोभिकरण नष्ट करून पून्हा नव्याने करण्याची वेळ आली तर शासनाचे होणारे नुकसान भरपाई कोण देणार ? याची जबाबदारी आपणा वर राहील असा इशारा निवेदनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे. आता या संदर्भात मुख्याधिकारी अजय कुरवाडे कधी आणि कोणती भूमिका घेतात, कसली कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मुख्याधिकारी कुणाला भितात ?

असाच प्रकार काही दिवसांपूर्वी आरपीआयचे विदर्भ उपाध्यक्ष संजय वाकोडे यांच्यासोबत देखील घडला. वाकोडे यांनी मुख्याधिकारी कुरवाडे यांना चिंच परिसरातील जुन्या सार्वजनिक प्रसाधनगृहाच्या जागेवरील अतिक्रमण काढून तेथे पुन्हा नव्याने प्रसाधनगृह बांधण्याची विनंती एका निवेदनाद्वारे केली होती. मात्र हे अतिक्रमण काढण्यासाठी आपल्याला पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी लागेल असे उत्तर कुरवाडे यांनी वाकोडे दिल्याची माहिती संजय वाकडे यांनी दिली. एकूणच मुख्याधिकारी गुरुवारी हे प्रत्येक अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची वाट का पाहतात, ते कुणाला भितात ? त्यांना दिलेल्या अधिकारांचा योग्य प्रकारे उपयोग करून ते नागरिकांना अतिक्रमणापासून मुक्त का करून शकत नाहीत ? की तसे करण्याची इच्छाशक्ती
मुख्याधिकारी कुरवाडे यांच्याकडे नाही ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने साहजिकपणे उपस्थित झाले आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129