
वेगळी बातमी – ‘ मन की बात ‘ मध्ये पंतप्रधानांनी उल्लेख केलेले नंदकिशोर लांडे हे आहेत मुळचे बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी. नाशिकला गोदावरीच्या स्वच्छतेचा घेतला वसा
MH 28 News Live, नांदुरा : तालुक्यातील डिघी येथील मुळ राहिवाशी असलेले व सध्या नाशिक येथे स्थायिक झालेले स्वच्छता दूत नंदकिशोर लांडे यांच्या कतृत्वाचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘ मन की बात ‘ या राष्ट्रीय कार्यक्रमात केल्यामुळे जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

डिघी येथे बालपण गेलेले नंदकिशोर लांडे लहानपणी गावच्या विश्वगंगा नदीचे पाणी पीत होते. त्या मुळे त्यांना स्वछतेची लहानपनापासूनच आवडत होती. त्यांच्या मुळगावात गावाकऱ्यांना खूपच आनंद झाला. स्वच्छतेसाठी धडपडणाऱ्या नाशिकच्या चंद्रकिशोर यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ८७ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात कौतुक केलं. महाराष्ट्रात नाशिक इथे एक स्वछाग्रही आहेत चंद्रकिशोर. त्यांनी गोदावरी नदी स्वच्छतेचा संकल्प केला आहे. ते गोदावरी नदीजवळ उभे राहून लोकांना नदीत घाण, कचरा न टाकण्याची विनंती करत असतात. त्यांचे हे प्रयत्न, जनजागृती करण्याबरोबर प्रेरणाही देतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले ?
आरोग्याचा थेट संबंध स्वच्छतेशी देखील आहे. ‘मन की बात’ मध्ये आपण नेहमी स्वच्छाग्रहींच्या प्रयत्नांविषयी नेहमीच बोलतो. असेच एक स्वछाग्रही आहेत चंद्रकिशोर पाटील. हे महाराष्ट्रात नाशिक इथे राहतात. चंद्रकिशोरजी यांनी स्वच्छतेचा फार मोठा संकल्प सोडला आहे. ते गोदावरी नदीजवळ उभे राहतात, आणि लोकांना नदीत घाण, कचरा न टाकण्याची विनंती करत असतात. जर कुणी असं करताना दिसला तर ते लगेच जाऊन त्याला थांबवतात. या कामात चंद्रकिशोर जी आपला खूप वेळ खर्च करतात. संध्याकाळ पर्यंत त्यांच्याकडे अशा गोष्टींचा ढीग जमा होतो, ज्या लोक नदीत फेकायला घेऊन आलेले असतात. चंद्रकिशोरजी यांचे हे प्रयत्न, जनजागृती देखील करतात आणि प्रेरणा देखील देतात. नाशिकचे चंद्रकिशोर, हे आपल्याला फार मोठी शिकवण देतात. नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पडले पाहिजे, स्वच्छता असो, पोषण असो, किंवा मग लसीकरण, या सगळ्या प्रयत्नांनी देखील निरोगी राहायला मदत होते, असे मोदी म्हणाले.



