♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ब्रेकींग न्यूज – न. प., जि. प., पं. स. इच्छुकांना पहावी लागणार आणखी ६ महिने वाट… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी आँक्टोबरनंतरच…!

MH 28 News Live : राज्यातील मुदत संपलेल्या २० महापालिकांसह, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी ऑक्टोबरनंतरच सुरु होण्याची शक्यता आहे.

या निवडणुका जून व जुलैमध्ये घेण्यास निवडणूक आयोग तयार असल्याबाबतचे वृत्त चुकीचे असून तसे कोणतेही प्रतिज्ञापत्र आयोगाने सादर केलेले नाही. उलट पावसाळ्यात निवडणूका घेण्यास अडचणी असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली.

कोल्हापुरात २३ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेचा समारोप झाला. त्यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणाची सुनावणी २५ एप्रिलला होत आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यास राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्याव्या लागतील. कारण शेवटी तो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असेल. तेव्हा तुम्ही निवडणूकीच्या तयारीला लागा असा आदेशचच कार्यकर्त्यांना दिला होता. परंतू २५ एप्रिलला ही सुनावणी झाली नाही. ही सुनावणी आता ४ मे रोजी होत आहे.

त्यापार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र घालून पावसाळ्यात निवडणूका घेण्यात अडचणी असल्याचे स्पष्ट केले आहे. एवढ्या सगळ्या निवडणूका एकाच टप्प्यात घेणेही शक्य नाही. त्या दोन-तीन टप्प्यात घ्याव्या लागतील असेही आयोगाचे म्हणणे आहे. त्यामुळे ४ मे रोजी जरी सुनावणी झाली तरी जून-जुलैमध्ये किंवा पावसाळ्यापूर्वी या निवडणूका होण्याची शक्यता नाही. दिवाळीनंतर या निवडणूकांचा बार उडणार आहे.

ऑक्टोबरमध्ये जरी ही प्रक्रिया सुरु झाली तरी किमान ३५ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असतो. त्यामुळे महाविकास आघाडी विरुध्द भाजपची राजकीय कुस्ती दिवाळीचे लाडू खावूनच होणार एवढे मात्र नक्की. २६ ऑक्टोबरला दिवाळी झाली की नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये निवडणूकीस कोणताही सण अथवा अन्य अडचण येणार नाही.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129