♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अवैध रेती वाहतूक करताना टिप्पर पकडले पोलिसांच्या कारवाईत १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

MH 28 News Live / देऊळगाव राजा : खडकपूर्णा जलाशयातून चार ब्रास अवैध वाळू उपसा करून वाहतूक करताना एक टिप्पर पोलिसांनी सिनगाव जहागीर फाट्यावर पकडले. वाळू सह १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल देऊळगाव राजा पोलिसांनी जप्त केले.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सिनगाव जहागीर फाट्यावर यातील आरोपी हा ४ ब्रास रेतीची चोरी करून वाहतूक करताना आढळला. टिप्पर चालकाकडे कुठलेही वैध परवाना आढळून ना आल्यामुळे सदर टिप्पर क्रमांक एम एच २८ बीबी ७८११ किंमत अंदाजे पंधरा लाख व ४ ब्रास रेती किमत २० हजार असा एकूण पंधरा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यासंदर्भात सरकार तर्फे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय शिवाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष बाबुराव डोईफोडे राहणार ‘डोलखेडा ता.जाफराबाद याच्याविरुद्ध अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ठाणेदार ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नितीन मिंड तपास करीत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129