
शाहीर ईश्वर मगर यांना महर्षी आत्माराम पाटील बाल पुरस्कार प्रदान
MH 28 News Live, मेहकर : महर्षी आत्माराम पाटील शाहीरी मंच औरंगाबाद शाहीरी मंचाच्या दशक पूर्ती वर्षां निमीत्त आणि राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या 113 व्या जयंती निमित्त व महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित शाहीर आत्माराम पाटील बाल पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. आत्म सन्मान 2022 सुधीर गव्हाणे कुलगुरू एम जी एम विद्यापीठ, श्रीमती अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद राजेश कावळे यांच्या शुभहस्ते आत्मसन्मान पुरस्कार हिवरा आश्रम तालुका मेहकर येथील शाहीर ईश्वर मगर आकाशवाणी, दूरदर्शन कलावंत यांना सन्मान पुर्वक प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना जेष्ठ शाहीर उपआयुक्त पुणे अंबादास तावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन युवा शाहीर अजिंक्य लिंगायत केले. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील कलावंत तसेच मान्यवर मंडळी उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button