
अबब…! अंबाबरवा अभयारण्यात अजगराने चक्क हरणाचं पिल्लू गिळलं; व्हायरल होत आहेत हे फोटो
MH 28 News Live / संग्रामपूर : बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर संग्रामपूर तालुक्यात अंबाबरवा अभयारण्य आहे. अंबाबरवा अभयारण्य बुलडाणा जिल्ह्याच्या उत्तर पूर्वेला सातपुड्याच्या कुशीत विसावलेले आहे.
या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी असून वेगवेगळ्या प्रजातीचे अजगर ही अभयारण्यात बघायला मिळतात. अजगराने हरणाचे पिल्लू गिळतानाचा व्हिडीओ एका पर्यटकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
” जीवो जीवस्य जीवनम् ” अर्थात निसर्गाच्या अन्नसाखळीचे जिवंत उदाहरण म्हणून या प्रसंगाकडे पाहणे उचित ठरेल. अजगराने गिळलेल्या हरणाच्या पिल्लाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button