♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

थरारक हत्याकांड ! शिरच्छेद करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; अज्ञात महिलेचा भीषण अंत, पोलिसांसमोर मोठं आव्हान !

MH 28 News Live / जळगाव जामोद : तालुक्यातील रसलपूरजवळील राजुरा लघु प्रकल्प परिसरात उघडकीस आलेल्या एका महिलेच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. अज्ञात आरोपीने अत्यंत क्रूरपणे महिलेचा खून करून तिची ओळख लपवण्यासाठी शिरच्छेद करत मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं सावट पसरलं असून नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

कुजलेले शिर सापडताच उडाली खळबळ

घटनेची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा स्थानिकांना राजुरा प्रकल्पाजवळ एका महिलेचं कुजलेल्या अवस्थेतील शिर आढळून आलं. मानवी मुंडकं दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता, काही अंतरावर त्याच महिलेचं धडही आढळून आलं. विशेष म्हणजे हे धड शिरच्छेद केलेल्या अवस्थेत असून अर्धवट जळालेलं होतं.

 

 

ओळख लपवण्यासाठी आधी हत्या, मग पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

प्राथमिक तपासात आरोपीने महिलेची गळा चिरून हत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून शिर धडावेगळं करण्यात आलं. एवढ्यावरच न थांबता, मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र मृतदेह पूर्णतः जळून न गेल्याने हा भयानक प्रकार उघडकीस आला. मृतदेहाची अवस्था पाहता ही हत्या काही दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांचा मोठा तपास सुरु

घटनेचं गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि फॉरेन्सिक टीमला तातडीने पाचारण करण्यात आलं. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तपासाची चक्रं वेगाने फिरू लागली असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथकं कार्यरत झाली आहेत.

सध्या मृत महिलेची ओळख पटलेली नसून परिसरातील बेपत्ता महिलांची माहिती पोलिसांकडून तपासली जात आहे. आरोपीने पुरावे नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केल्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. या भीषण हत्येमागचं कारण काय, मृत महिला कोण होती आणि हा अमानुष गुन्हा नेमका कोणी केला, याचा छडा लावण्यासाठी पोलिस यंत्रणा कसून तपास करत आहे

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129