♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीत बॉम्बे मार्केटमध्ये भीषण आग, मोठा अनर्थ टळला…

MH 28 News Live / चिखली : बॉम्बे मार्केट परिसरात आज सकाळी लागलेल्या भीषण आगीमुळे शहरात एकच खळबळ उडाली. बॉन्द्र पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या जहीर खान कुरेशी यांच्या भंगार दुकानाला अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बोंद्रे पेट्रोल पंपाच्या जवळच ही आगीची घटना घडली. जवळच असलेला पेट्रोल पंप मात्र सुरक्षित राहिला अन्यथा फार मोठा अनर्थ आणि दुर्घटना घडण्याची शक्यता यावेळी निर्माण झाली होती.

आग काही क्षणांतच भीषण स्वरूप धारण करत दुकानातील मोठ्या प्रमाणातील भंगार साहित्य जळून खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पेट्रोल पंपाच्या अगदी शेजारी आग लागल्यामुळे काही काळ मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर वेळेत आग आटोक्यात आणण्यात यश आल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे चिखली शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129