♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गौरक्षकच बनले भक्षक … कृष्णाई गोशाळेच्या ४५ गोवंशांची कोंबून वाहतूक..३ वाहनांसह १९ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

 

MH 28 News Live / जळगाव जामोद ( अमोल भगत ) : स्थानिक कृष्णाई गोशाळेच्या ४५ गोवंशांची कोंबून वाहतूक केली जात असताना पकडण्यात आली असून ३ वाहनांसह १९ लाख २० हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.
४५ गोवंशांची कोंबुन विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी तीन आयशर वाहनांसह १९ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल स्थानिक पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून जप्त केला. दिनांक १४ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० चे दरम्यान तीन आयशर वाहनांमध्ये ४५ जनावरे विना परवानगी तसेच वाहनांमध्ये कोंबलेल्या स्थितीत पोलिसांना पिंपळगाव काळे येथे नाकाबंदी दरम्यान दिसून आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांनी जनावरे वाहतूक प्रकरणी तीनही आयशर वाहनांकडे वाहतूक परवाना असल्याचे विचारणा केली असता तिन्ही वाहनचालकांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. यावेळी पिंपळगाव काळे येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये निळ्या व पांढऱ्या रंगाचे आयशर क्रमांक एमएच १८ बीए ४७०७, तपकिरी रंगाचे आयशर क्रमांक एमएच ३० बीबी २८२७ व एमएच ४२ टी १६६१ या तीन वाहनांमध्ये कृष्णाई गोशाळेच्या ४५ गाई कोंबलेल्या स्थितीत मिळून आल्या. यावरून तिन्ही वाहने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आणण्यात आली होती. यावेळी घटनास्थळी नागरिकांच्या चर्चांना उधाण आले होते. यामध्ये गोवंश तस्करी वाढली हिंदू गाडी चालक “गोरक्षक” भक्षक असल्याची चर्चा रंगली.
यावेळी पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून तिन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली व तिन्ही वाहनाचे चालक आसिफ शेख युसुफ वय ३७ वर्ष राहणार साखळी तालुका यावल जिल्हा जळगाव खान्देश, वसंत रामकृष्ण म्हसाळ वय ५२ वर्ष राहणार गंगानगर जळगाव जामोद, अशोक पांडुरंग ढगे वय ५० वर्ष राहणार आचल नगर जळगाव जामोद यांच्यावर अप नंबर ८२/२०२५ कलम ११ (१) (घ)(ड)(च) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० प्रमाणे सरकारतर्फे महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपीतांवर गुन्हा दाखल केला असून तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित करीत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129