
देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलेल्या माजी सैनिकाची मोटारसायकल लंपास, चिखलीतला प्रकार
MH 28 News Live, चिखली : मुलाचा विवाह सोहळा आटोपून बाहेरगावी देवदर्शनासाठी गेलेल्या चिखली येथील एका माजी सैनिकाची स्कूटर अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली यासंबंधी चिखली पोलिसांकडे दि. 27 मे रोजी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे
यासंदर्भात थोडक्यात माहिती अशी आहे की, अशोक तुकाराम निळे ( 58 ) हे माजी सैनीक संभाजी नगर येथे राहतात. मुलाचे लग्न पार पडल्यानंतर निळे कुटुंबातील सर्व सदस्य दि. 24 मे रोजी देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले. दरम्यान अशोक निळे यांच्या मुलाचा मित्र असलेल्या भागवत मंडळकर याने ” घराच्या बाजूला असलेल्या टीनशेडमध्ये ठेवलेली तुमची स्कुटर तिथे दिसून येत नाही ” अशी माहिती निळे यांना दिली. सन 2019 मध्ये खरेदी केलेली SUZUKI स्कुटर क्र MH 14-FE 9778, चेचीस क्र MBFDE11AK8233807 व इंजिन क्र. AF211125938 मॉडेल नंबर ACCESS125UZEN ही स्कुटर दि. 25 मे रोजी रात्री 02 . 30 वाजेच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी चोरुन नेतांना या परिसरातील काही जणांनी पाहीले असल्याची माहिती फिर्यादी अशोक निळे यांनी आपल्या तक्रारीत दिली आहे. दाखल झालेल्या तक्रारीवरून चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.