♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अखेर त्या खुनाचे रहस्य उलगडले ! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकर व मुलाच्या मदतीने काढला काटा. भूमराळा शिवारात खून. आरोपी १२ तासांत अटक

MH 28 News Live, लोणार : स्वतःच्या अनेतिक संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा आपला प्रियकर व आपल्या मुलाच्या मदतीने गळा आवळून पत्नीने खून केल्याची घटना लोणार तालुक्यातील बीबी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. भुमराळा शिवारामध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात विविध तर्ककुतर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे या घटनेचा तपास लावून अवघ्या १२ तासांमध्ये बीबी पोलिसांनी आरोपींना गजाआड केले आहे.

याबद्दल थोडक्यात माहिती अशी की, भुमराळा येथील संगीता रामदास सरकटे ( ४२ ) या विवाहितेचे गावातील ज्ञानदेव रामप्रसाद आघाव ( ३४ ) याच्याशी विवाहबाह्य अनैतिक संबंध होते. या संबंधात पती रामदास त्र्यंबक सरकटे हा अडसर ठरत होता. त्यामुळे या पत्नी – पत्नीमध्ये वारंवार भांडण होत असे. आपल्या संबंधांना विरोध करणाऱ्या पतीचा कायमचा काटा काढण्याचा कट पत्नी संगीताने आखला. त्यानुसार दि. ९ जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पत्नी संगीताने आपला प्रियकर ज्ञानदेव रामप्रसाद आघाव व मुलगा तेजस रामदास सरकटे यांच्या मदतीने रामदास यांचा दोरीने गळा आवळून व डोक्यात दगडाने मारून खून केला. त्यानंतर या तिघांनी मयत रामदास आघाव याचे प्रेत भुमराळा शिवारामध्ये येणाऱ्या जनाबाई प्रकाश चव्हाण यांच्या शेतातील विहिरीमध्ये टाकून ते घरी परतले.

आपली कार्यतत्परता दाखवत बिबी पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या १२ तासात तपास लावला. संगीता रामदास सरकटे, ज्ञानदेव रामप्रसाद आघाव आणि अल्पवयीन तेजस रामदास सरकटे या तीन आरोपींवर कलम ३०२ ,१२० ,ब,३४ भांदवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

आरोपीचे सदरचे कृत्य हे अत्यंत शिताफीने व सर्व काळजी बाळगून गोपनीय पद्धतीने केले होते. परंतु १२ तासाच्या आत या गुन्ह्याची उकल करण्यात बिबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांचेसह पोलीस उपनिरीक्षक गोपाल राठोड, पोहेका कलीम देशमुख, नापोका अरुण सानप, अर्जुन सांगळे, नितीन मापारी यांना यश आले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129