राहुल गांधींच्या ईडीकडून चौकशी विरोधात लोणारमध्ये काँग्रेसने केला रास्ता रोको
MH 28 News Live, लोणार : काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांची कारण नसताना ई डीची चोकशी करणे, कारण नसतांना मानसिक व शारीरिक त्रास देणे हे धोरण केंद्रातील भाजपा सरकारने राबवत असल्याचा आरोप करत आज लोणार तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तालुका अध्यक्ष राजेश मापारी व शहर अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात लोणार शहरातील बस्सटेंड समोर शेकडो कार्यकर्त्यासह रस्ता रोको करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे, नगरपरिषद उपाध्यक्ष बादशहा खान, गटनेते भूषण मापारी, आरोग्य सभापती संतोष मापारी, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष तोफिक कुरेशी, ओ बी सी सेल जिल्हाध्यक्ष गजानन खरात, जेष्ठ नेते प्रकाश धुमाळ, युवा जिल्हाध्यसह अनिकेत मापारी, नगरसेवक शेख रऊफ शेख महेबूब, आबेद खान पठाण, रमजान परसुवाले, गुलाब सरदार, पंढरी चाटे, रामचंद्र कोचर, बंडू मापारी, मोसीन शहा शेख जुनेद शेख करामत नारायण मापारी सुनील मापारी आंबदास इंगळे आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी सर्व काँग्रेस कार्यकर्ते यांचा भाजपा सरकार विरोधात रोष दिसून आला अश्या चुकीच्या कारवाया जर केंद्र सरकार ने थांबवल्या नाहीत तर आजून तीव्र जनआंदोलन करू असा इशारा या वेळी काँग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button