स्व. जनूभाउ बोंद्रे यांना चिखली शहर कॉग्रेसतर्फे वाहिली श्रध्दांजली
MH 28 News Live, चिखली : बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार स्व. जनूभाऊ उपाख्य जनार्दन दत्तुअप्पा बोंद्रे यांचे दिनांक 4 जुलै 2022 रोजी नाषिक येथे वृध्दापकाळाने निधन झाले. चिखली शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने आज त्यांना श्रध्दांजली अर्पन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, यांच्यासह कॉग्रेसचे ज्येष्ठ आजी माजी पदाधिकारी व कार्यर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिीती होती.
स्थानिक जयस्तंभ चौकातील जनसेवा कार्यालयात चिखली शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार स्व. जनूभाउ बोंद्रे यांना पुष्प व शब्द सुमनानी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित कॉग्रेस पदाधिकारी व नेत्यांनी स्व. जनूभाउ यांच्या जीवनकाळातील आठवणींना उजाळा दिला. जनूभाउ बोंद्रे यांनी तब्बल 18 वर्ष बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीची धुरा यशस्वीपणे साभाळली. सन 1978 मध्ये त्यांनी आमदार म्हणून चिखली विधानसभा मतदार संघाचे कार्य पाहिले. वयाच्या 80 व्या वर्षी जनुभाउ बोंद्रे यांचे वृध्दापकाळातील आजाराने नाशिक येथे निधन झाले. त्यांचे इच्छेप्रमाणे नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांचे देहदान करण्यात आले.
श्रध्दांजली सभेत बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह माजी नगराध्यक्ष प्रकाश बोंद्रे, पप्पुसेठ हरलालका, शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, जिल्हा परिषद सदस्या डॉ. ज्योतीताई खेडेकर, विष्णू पाटील कुळसुंदर, डॉ. मोहमंद इसरार, डॉ. सत्येंद्र भुसारी, नंदकिशोर सवडतकर, धीरज रूपारेलीया, करूणाताई बोंद्रे, प्रमोद पाटील, भगवानराव काळे, रवींद्र तोडवकर, विद्याताई देशमाने, प्रमिलाताई जाधव, हिरीवाले ताई, साहेबराव पाटील, सचिन बोंद्रे, असिफ भाई, रफिकसेठ, हाजी रउफभाई, राजू रज्जाक, गोपाल देव्हडे, गोकुळ शिंगणे, दीपक थोरात, भगवानराव खरात, आत्माराम देशमाने, अमीनखॉ उस्मानखॉ, प्रदीप पचेरवाल, सदानंद मोरगंजे, डॉ. संजय घुगे, कैलास खराडे, कपील बोंद्रे, विजय जागृत, डिगांबर देशमाने, शहेजादअली खान, सुनील बोंद्रे, संजय बोंद्रे, शिवा म्हस्के, संजय गिरी, शैलेश अय्या, शरद पाटील, प्रकाश सपकाळ, नईम जमदार, समाधान भटकर, बाळू बोंद्रे, शुभम पडघान, पवन गवारे, जाकीर भाई, संदीप भावसार, जे.बी. इंगळे, जितू राणा, अश्विन जाधव, प्रकाश तायडे, अनिस जमदार, मोहन खपके, रमेशअप्पा साखरे, शिव परीवाराचे इंगळे, मायकल अण्णा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, अनुराधा परीवार व हिरकणी परीवाराचे सदस्य मोठया संख्येने उपस्थिीत होते.
तर यावेळी छोटेखानी पार पडलेल्या बैठकीत येत्या 18 जुलै रोजी स्थानिक मौनीबाबा संस्थान चिखली येथे दुपारी 1 वाजता बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने स्व. जनूभाऊ बोंद्रे यांना सर्वपक्षीय तथा जिल्हास्तरीय सामुहिक श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आयोजकाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button