
स्व. भाऊराव कापसे यांच्या पार्थिवावर शेलसूर येथे शोकाकुल वातावरणात झाले अंत्यसंस्कार. काल झाला होता अपघाती मृत्यू
MH 28 News Live, चिखली : येथील जुने गाव परिसरातील गणेश नगर भागात राहणारे निवृत्त शिक्षक भाऊराव उत्तमराव कापसे यांचे दि. १९ मार्च रोजी खामगाव चिखली महामार्ग मार्गावर ट्रॅक्टरला मोटरसायकलची धडक लागून झालेल्या अपघातामध्ये निधन झाले. स्व. भाऊराव कापसे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र कापसे यांचे वडील होते. त्यांच्या पार्थिवावर मुळगाव शेलसूर येथे दि. २० मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.
या संदर्भात स्व. भाऊराव कापसे यांचे भाचे ग्रामसेवक अमोल शिंदे यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार दि. १९ मार्च रोजी संध्याकाळी साडेसात वाजेदरम्यान अमोल शिंदे यांचे नातेवाइक शालीकराम काळे ( रा. पुंडलीक नगर चिखली ) यांचा फोन आला. ते म्हणाले की, माझे व्याही व तुमचे मामा भाउराव उत्तमराव कापसे यांचा शेलसूर येथून स्पेलडर मोसा क्र एम एच 19-0-5902 चिखली येथे येत असतांना संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास अपघात झाला. ही माहिती मिळताच अमोल शिंदे तातडीने घटनास्थळी पोहचले. तेथे
पाहीले असता त्यांना स्व. कापसे यांची अपघातग्रस्त मोटार सायकल आढळून आली. जवळच असलेल्या पेट्रोल पंपावरील लोकाना विचारपूस केली असता भाऊराव कापसे यांना लोकानी जखमी अवस्थेत चिखली येथे ग्रामीण रुग्णालयात नेल्याची माहिती मिळाली. त्यावरून अमोल शिंदे रुग्णालयात गेले असता तेथे त्यांचे मामा भाऊराव कापसे मृतावस्थेत आढळून आले. वैद्यकीय अधिकार्यांना विचारपूस केली असता त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे मरण पावल्याचे सांगितले.
या दूर्घटनेतील अज्ञात ट्रक्टर चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक्टर भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून माझे वर नमूद मामाचे मोटार सायकल क्रं एम एच 19 – 0 – 5902 ला धडक देवून त्यांचे मरणास कारणीभूत झाला. व सदर अपघातामध्ये मोटार सायकलचे अंदार्ज १० हजाराचे नूकसान झाले तसेच अपघातास्थळी कुठलीही मदत न करता अपघात करून पळून गेला आहे. तरी त्याचेवर योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी अमोल शिंदे यांनी केली आहे. या घटनेचा तपास हेडकाँस्टेबल शशिकांत धारकरी करत आहेत.
शेलसूर येथे झाले अंत्यसंस्कार
आपल्या दैनंदिन दिनक्रमानुसार चिखली येथील राहत्या घरुन शेलसूर येथील शेतात गेलेले भाऊराव कापसे यांच्या निधनामुळे कापसे परिवारावर दु : खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन सुना, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. दि. २० मार्चला त्यांच्या पार्थिवावर मुळगाव शेलसूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्या नातलगांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळीची उपस्थिती होती.



