♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ३१ हजार शिक्षकांची पदे रिक्त. राज्यातील शिक्षक पदभरतीचा अनुशेष सुमारे एक लाखावर

MH 28 News Live : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षकांचा मोठय़ा प्रमाणावर तुटवडा असूनही मागील 5 वर्षांपासून शिक्षक भरती न झाल्याने शिक्षक अध्यापक पदविका, पदवी (डीटीएड, बीएड) पात्रता

सद्यस्थितीत या शाळांध्ये 32 हजार 472 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यातील सर्वाधिक रिक्त पदे ही जिल्हा परिषद शाळांमध्ये 19,452 अशी आहेत. त्याखालोखाल महापालिका शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांपेक्षा रिक्त पदांचा आकडा मोठा असून या शाळांत 11 हजार 98 शिक्षकांची कमतरता आहे.

राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीच्या आधारे उघड झाले आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषद आणि छावणी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदाची माहिती मिळाली आहे. खाजगी संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांची रिक्त पदे यापेक्षा जास्त आहेत. तसेच पेंद्रप्रमुख, मुख्याध्यापक ही पदे सरळसेवेने भरण्याबाबत शासन निर्णय जाहीर होऊनही ही पदेदेखील रिक्त आहेत. आदिवासी, समाजकल्याण, आश्रमशाळा, अल्पसंख्याक विभागाच्यावतीने सुरू असलेल्या शाळांमध्येदेखील शिक्षकांची कमतरता असून सर्व शाळांमधील रिक्त शिक्षकांची संख्या लाखाच्या आसपास असण्याची शक्यता डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनने व्यक्त केली आहे.

राज्यातील प्राथमिक शिक्षक संख्या
शाळा मंजूर पदे कार्यरत रिक्त
जिल्हा परिषद 2,19,428 1,99,976 19,452
महापालिका 19,960 8862 11,098
नगर परिषद 6037 5136 901
छावणी 166 145 21
एकूण 2,45,591 2,14,119 31,472

पात्रताधारक बेरोजगार शिक्षकांमध्ये नाराजी
राज्यात 2010नंतर शिक्षक भरती झाली नाही. 2017मध्ये पवित्र पोर्टलवरून भरती प्रक्रिया सुरू झाली, मात्र अद्याप ती अपूर्ण आहे. त्यामुळे पात्रताधारक बेरोजगार शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. रिक्त शिक्षक पदांची माहिती समोर आल्याने शिक्षक भरती सुरू करून राज्यातील शिक्षणाचा स्तर उंचावण्याची गरज आहे.
संतोष मगर, अध्यक्ष,
डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129