
चिखली तालुका काँग्रेस कमिटी अनु. जाती विभागाच्या अध्यक्षपदी विनोद पवार
MH 28 News Live, चिखली : पत्रकार विनोद सहादु पवार ह्यांची चिखली तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद अवसरमोल यांनी एका पत्राद्वारे केली.
जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच जिल्हा दक्षता समितीचे माजी अशासकीय सदस्य विनोद पवार हे काँग्रेस पक्षाचे संघटन व मागासवर्गीय समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात. सदर नियुक्तीचे श्रेय खासदार मुकूल वासनिक, महाराष्ट्र प्रदेेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिध्दार्थ हत्तीहंबीरे तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे ह्यांना असल्याचे प्रतिपादन विनोद पवार यांनी केले.