
बाळासाहेब देवरस प्राथमिक विद्यामंदिरात पालक मेळावा संपन्न
MH 28 News Live, चिखली : शालेय शिक्षण प्रक्रियेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सह पालकांचा सुद्धा सहभाग असावा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात यांच्या बरोबरीने पालकांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखून शैक्षणिक प्रक्रियेत सहभागी व्हावे या उद्देशाने बाळासाहेब देवरस प्राथमिक विद्यामंदिरातर्फे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष अँड. मंगेश व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या मेळाव्यासाठी मुख्य अतिथी म्हणून गटशिक्षण अधिकारी सपकाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संस्थेचे सचिव सुदर्शन भालेराव यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेत राबवत असलेल्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे वक्ते चांदने कोचिंग क्लासेसचे संचालक सुरेश चांदने यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थी व शिक्षकासोबत पालकांना सुद्धा आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेचे विश्वस्त धनंजय व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या हेतूने प्रत्येक वर्गातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास अकराशे रुपये रोख स्वरूपाने बक्षीस देण्याचे जाहीर केले. यावेळी पालकांमधून सुद्धा सागर जावळे यांनी मराठी शाळेची महती विशद केली. संस्थेचे अध्यक्ष मंगेश व्यवहारे यांनी शिक्षणाच्या प्रक्रियेत पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व आपल्या पाल्याचे उज्वल भविष्य घडवावे असे प्रतिपादन केले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त नारायण भवर मुख्याध्यापक शिवाजी पारवे तसेच माता व पिता पालकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बदर सर यांनी तर आभार प्रदर्शन पारवे सर यांनी केले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button