
” तुमच्या मुलीचे लग्न का लावून दिले; मी तिला ठेवून घेणार होतो ” असे म्हणत प्रेयसीच्या घरासमोर धतिग करणार्या युवकावर चिखलीत दाखल झाला गुन्हा
MH 28 News Live, चिखली: प्रेमात जात आडवी आल्याने त्याचे तिच्याशी लग्न होऊ शकले नाही. घरच्यांनी तिचे लग्न समाजातील मुलाशी लावून दिले. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने तिच्या आई- वडिलांच्या घरासमोर राडा केला. तुमची मुलगी परत आणली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली. चिखली शहरातील भीमनगरात काल, ३१ मार्चला संध्याकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत चौधरी ( रा. भीमनगर, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. भीमनगरातील एका महिलेने (४५) दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या मुलीचे आणि त्यांच्याच मोहल्यात राहणाऱ्या प्रशांतचे प्रेमसंबंध होते. दोघांना लग्न करायचे होते. मात्र दोघांचा समाज वेगळा असल्याने त्यांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी पनवेल येथील समाजाच्या मुलाशी त्यांनी मुलीचे लग्न लावून दिले होते.
काल, ३१ मार्च रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास प्रशांत त्यांच्या घरासमोर आला. तुमच्या मुलीचे लग्न का लावून दिले. मी तिला ठेवून घेणार होतो. तुम्ही जर मुलगी इथे आणली नाही तर तुम्हाला जीवे मारेन, अशी धमकी त्याने मुलीच्या आई- वडिलांना दिली. तुमच्या मुलाला गाडीने उडवून देईल, अशी धमकी देत घरासमोर राडा केला. या तक्रारीवरून पोलिसांनी प्रशांत चौधरी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button