
योगी सरकारचा मोठा निर्णय मंदिर मशीदीवरचे भोंगे आता शाळेवर लागणार
MH 28 News Live : उत्तरप्रदेशमधील मशिदीवरील उतरवलेले भोंगे शाळांवर लावले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. उत्तरप्रदेशमध्ये अनावश्यक पद्धतीने लावण्यात आलेले सर्व भोंगे खाली उतरवण्यात आले असल्याचंही त्यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं.
संवादाच्या माध्यमातून आम्ही अनाधिकृत भोंगे खाली उतरवले आहेत. अधिकृत लाउडस्पीकरचा आवाज हा संबंधित परिसरातंच राहील, त्याचा त्रास इतरांना होता कामा नये.” असे आदेश त्यांनी दिले आहेत. खाली उतरवण्यात आलेले भोंगे शाळेत जनजागृसाठी लावण्यात येणार आहेत असंही ते म्हणाले. याबरोबरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनाधिकृत वाहन स्थानकांना दोन दिवसांच्या आत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. रस्ते सुरक्षेसंदर्भातही कडक निर्देश योगींनी दिले आहेत.
सरकारने आखून दिलेले नियम आणि आवाजाची पातळीचे नियम मोडण्यात आले तर तेथील स्थानिक पोलिस अधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाणार आहे. संवादाच्या माध्यमातून सर्वानुमते मशिदीवरील अनाधिकृत भोंगे खाली उतरवले आहेत. त्या भोंग्याचा वापर गरजेनुसार शाळेत केला जाणार असून त्याचाही आवाज त्याच परिसरात राहील याची काळजी घेतली जाणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.
याबरोबरच त्यांनी रस्ते आणि रस्ते सुरक्षा यासंदर्भात कडक निर्देश दिले आहेत. रस्ताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांनी अवैध पार्किंग समस्यामुळे रस्तावरील अपघातांत वाढ होत असल्याचं सांगितलं. तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये रस्ते सुरक्षेच्या संदर्भात जागृती करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.



