♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

घरफोडी करून चोरटा पसार झाला पण आपला मोबाईल मात्र घटनास्थळी विसरला

  • MH 28 News Live, बुलडाणा : चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत २१ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला मात्र आपला मोबाईल फोन तेथेच विसरून राहिलेला तो चोरटा ऐताच पोलीसांच्या रडारवर आला आहे. बुलडाणा शहरात घडलेल्या या घटनेची सर्वत्र खमंग चर्चा मात्र होत आहे.

 

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, बुलडाण्यातील गणराज नगर भागात राहणारे अमोल पंढरीनाथ वाघ हे बाहेरगावी गेले असता दि. ११ मार्च रोजी भर दुपारी तीन वाजता त्यांच्या घरात चोरी झाली. मेकअपचे साहित्य, १२ / १३ साड्या आणि ट्रिमर मशीनसह एकूण २० हजाराच्या वस्तूंवर चोरट्यांनी हात साफ केला. मात्र हा मुद्देमाल घेऊन जाणारा तो विसरभोळा चोर आपला मोबाईल फोन अमोल वाघ यांच्या घरातच सोडून गेला.

 

या मोबाइलमुळे तो चोरटा आयताच पोलिसांच्या रडारवर आला असून लवकरच तो गजाआड होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास नापोकाँ बळीराम खंडागळे करत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129