♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बुलढाणा जिल्ह्यात तुफान गारपीट; शेकडो हेक्टरवरील पीकांचे प्रचंड नुकसान

MH 28 News Iive, चिखली : तालुक्यात गारांचा सडा पडला असून, अवकाळी पावसाने नंगानाच चालविला होता. या पावसामुळे गहू, हरभरा, मका, कांदा या पिकांसह आंब्याची प्रचंड नासाडी झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्याने शेतकर्‍यांचे डोळे पांढरे झाले आहेत. मिसाळवाडी, पिंपळवाडी, शेळगाव आटोळ, अंढेरा या परिसरात तर बोराएवढ्या गारा पडल्या. या गारपिटीने आंब्याला लागलेला मोहोर व काही ठिकाणी आलेल्या कैर्‍या गळून पडल्या आहेत. गहू, हरभरा या पिकांची तर नासाडी झाली आहे. चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या तालुक्यांसह लोणार, मेहकर या तालुक्यांतदेखील या गारपिटीने मोठे नुकसान झालेले आहे.

राज्य सरकारने कर्मचारी संपावर तातडीने तोडगा काढून महसूल विभागाला तातडीने पंचनामे करण्यास लावून शेतकर्‍यांना या पीक नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी करत आहेत. चिखली तालुक्यातील जवळपास ६० गावांत गारपीट झालेली आहे. त्यामुळे गहू, हरभरा, मका ही पिके आडवी झालीत. तर कांदा, टरबूज, खरबूज, पपई, पाणतांडे यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. या भागात आंब्याला यंदा चांगला मोहोर फुटला होता. तसेच, वैâर्‍याही लगडल्या होत्या. मात्र गारपिटीमुळे मोहोर व वैâर्‍या गळून पडल्या आहेत. रब्बी हंगामावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांचे झालेल्या अतोनात नुकसानीने डोळे पांढरे झालेले आहेत. मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, पिंपळवाडी, अमोना, कोनड, अंढेरा, इसरूळ-मंगरूळ, मेरा, अंचरवाडी या परिसरात पीक नुकसानीचे प्रमाण मोठे आहे. चिखली, हातणी, धोडप, कोलारा, शेळगाव आटोळ, चांधई, एकलारा व पेठ या सर्वच महसूल मंडळात जोरदार गाारपीट झालेली आहे. गहू, हरभरा, भाजीपाला, फळबागा या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं. या दरम्यान काही भागात रिमझिम पाऊस पडला. मात्र काल सायंकाळी आणि आज दुपारी खामगाव, मलकापूर तालुक्यात प्रचंड गारपीट झाली..सोबतच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसही पडला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा मानसिक धक्का बसलाय. शेतातल्या उभ्या पिकांचे नुकसान झालंय. यात गहू, हरभरासह इतर पिकांचं नुकसान झालंय. सुलतानी संकटासोबतच अस्मानी संकट सुद्धा शेतकऱ्यांवर कोसळलं. यात हाताशी आलेल्या गहू, हरबरा, मका, कांद्यासह फळबागांचे प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

देऊळगाव साकरशा परिसरात पडली बोराऐवढी गार, कांदा, आंबा, टरबुजाचे नुकसान!
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा परिसरात आज दुपारी चार वाजेदरम्यान गारपीट झाली. यामध्ये बोराएवढी गार पड़ली. गारांसह पड़लेल्या पावसाने कांदा, आंबा, टरबूज यासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. दे. साकरशा परिसरात जवळ जवळ अर्धा तास गारपीट झाली. त्यात वीटभट्ट्यांचेही नुकसान झाले असून, नुकसानाचा सर्व्हे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच संदीप अल्हाट, ग्रामपंचायत सदस्य रणजीत देशमुख, शे.अबरार, तंटामुक्त समिती अध्यक्ष बी. एम. राठोड यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे. तसेच मलकापूर तालुक्यासह जिल्ह्यात काही भागात गारांसह पाऊस झाल्याची माहिती आहे. दरम्यान, नुकसानीची पाहणी करण्याचे तलाठी यांना सांगितले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129