
शिवशाही बसेसना मिळणार कायमची सुट्टी…! जाणून घ्या काय आहे कारण
MH 28 News Live : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने खासगी ट्रॅव्हल्सची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी कंबर कसत राज्यातील मुख्य मार्गांवर शिवशाही ( Shivshahi ) एससी बस सेवा सुरु केली होती. यासाठी खासगी कंपन्यांशी करार शिवशाही नावाने बस गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. परंतु, ३० जून पासून ही सेवा बंद करण्यात आली आहे. त्या मार्गावर आता एसटीची लाल परी धावेल असा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने शिवशाही एसी बसची सेवा सुरु केली होती. त्यासाठी सन २०१८ मध्ये खासगी कंपनींकडून करण्यात आले. शिवशाही गाड्यांना एसटीकडून प्रतिकिमी २९ रुपये शुल्क दिले जायचे. त्याशिवाय डिझेल पुरवठा आणि वाहक एसटीचा असायचा. गाडीची देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता व चालक ही जबाबदारी संबंधित कंपनीची होती.
सुरुवातील या उपक्रमाला अल्पसा प्रतिसाद होता. पण त्यानंतर महामंडळाने भाड्यात कपात करत प्रवाशांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला काही प्रमाणात यश आले. तीन वर्षांनंतर २०२१ मध्ये त्या कंपन्यांना मुदत वाढ देण्यात आली. मागील सहा वर्षांपासून राज्यभरात शिवशाहीची दौड सुरू होती.
महामंडळाच्या ताफ्यात विविध कंपन्यांच्या २१६ बस होत्या. त्यात काही आरामदायी स्लीपर एसी बसही होत्या. विशेषत: पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नागपूर आदी मार्गांवर शिवशाही सेवा देत होती.
या कंपन्याचा महामंडळासोबत असलेला करार ३० जूनच्या रात्री संपला. गेल्या महिनाभरात कंपनीने १०० गाड्या टप्प्याटप्प्याने एसटीच्या सेवेतून बाहेर काढल्या होत्या. त्यानंतर आता ३० जूनच्या रात्री शिवशाहीची पूर्णत: सेवा बंद केली आहे. त्यामुळे शिवशाहीचे काही चालक कंत्राटी स्वरूपात एसटीकडे रुजू झाले. तसेच ज्या मार्गावर शिवशाही बस धावत्या होत्या. त्या मार्गावर महामंडळाच्या गाड्या धावणार आहेत.
काही महिन्यांपासून शिवशाही सेवा बंद झाल्यानंतर तिची उणीव भरून काढण्यासाठी महामंडळाने शिवाई बसची खरेदी केली आहे. या बस इलेक्ट्रिक असून त्या संपूर्ण वातानुकूलित आहेत. मोठ्या शहरातील आगारामध्ये काही शिवाई गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यांची नियमित सेवा सुरू करण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button