♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

वळतीमध्ये धार्मिक तणाव होण्याआधीच चिखली पोलीसांची रॅपिड ॲक्शन, ८ जणांवर गुन्हे दाखल

MH 28 News Live / चिखली : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वळती येथे दि. १४ जानेवारी रोजी वैयक्तिक भांडणातून दोन गटांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाली. सुदैवाने चिखली पोलिसांनी कार्य तत्परता दाखवत अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे मोठा जाती धार्मिक तणाव होण्यापूर्वीच निवळला. सदर घटनेतील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आज त्यांना चिखली न्यायालयामध्ये उपस्थित केले जाणार आहे.

या संदर्भात थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी प्रशांत धनवे हा काल रात्री ८ वाजता त्याचे दूध संकलन केंद्रावर हजर असताना तेथे साक्षीदार गोपाल धनवे हा दूध घेऊन आला व दूध देऊन परत मोटार सायकल घेऊन घरी जात होता. त्या वेळी नादर खा गुलशर खा (५०) हा तेथे आला व गोपाल धनवे यास तू माझे तोंडावर मोटरसायकलचा लाईट का मारला असे म्हणून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. प्रशांत धनवे यांनी नादरखा याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याला सुद्धा शिवीगाळ करून चापट मारली. त्यानंतर नादरखा याने अलतमश खा साबेर खा राहील रइस पटेल, सिराज मस्तान पटेल, इब्रान मस्तान पटेल, शोराब मस्तान पटेल, आसिफ आजीम पटेल, आजीम हनीफ पटेल यांना बोलावून घेतले. या सर्वांनी प्रशांत धनवे व साक्षीदार यांना लाथा बुक्क्यांनी व लोखंडी फायटर मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमक्या दिल्या. फिर्यादी प्रशांत धनवे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून  चिखली पोस्टेला २०२५ कलम ११८ (१) ११५ (२) १८९ (२)१९१(२) १९१ (३) १९०, १३५ (२) ३५१(३)३५२ या भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद भागवतकर हे पुढील तपास करत आहेत

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129