
विजयराज शिंदे यांचा गोपाल नकवाल यांच्याकडून सत्कार
MH 28 News Live : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी दोन दिवसांपूर्वी नव्या नियुक्त्या जाहीर झाल्या. यामध्ये जिल्ह्यातील घाटावरच्या भागाचे अध्यक्षपद बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले. शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मावळत्या कार्यकारिणीतील जिल्हा उपाध्यक्ष गोपाल नाकवाल यांनी यांच्या बुलढाणा येथील निवासस्थानी भेट घेऊन जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार केला व शिंदे यांना भावी कार्यकाळाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भगवान बेंडवाल, विमल बेंडवाल. रघु बेंडवाल. आणि इतर सहकारी उपस्थित होते.